चेन्नई : हिंदी भाषा आपल्यावर लादली जात असल्याचा सूर कायम ठेवीत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) काढलेल्या सूचनेला डावलत राज्यातील अण्णा विद्यापीठ व अलागप्पा विद्यापीठांना हिंदी भाषा लागू न करण्याचे निर्देश दिले आहेत.
या दोन्ही संस्थांना विद्यापीठाचे परिपत्रक मिळाले होते. ज्यात पदवी अभ्यासक्रमात हिंदीभाषेला इंग्रजी भाषेप्रमाणोच प्राथमिक भाषेसारखे शिकविले जावे, असे म्हटले होते. हे परिपत्रक काढण्याचा निर्णय 2क्11 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अधीन असलेल्या केंद्रीय हिंदी समितीने घेतला होता. (वृत्तसंस्था)