शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

27 किलो सोने, 10000 साड्या, 1562 एकर जमीन; जयललितांची संपत्ती तामिळनाडूला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:53 IST

कोर्टाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची संपत्ती तामिळनाडूकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

बंगळुरू: कर्नाटक उच्च न्यायालयानेतामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी संबंधित 27 किलो सोने, चांदी, हिऱ्यांचे दागिने आणि 1,562 एकर जमिनीची कागदपत्रे तामिळनाडू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. 24 वर्षांनंतर हा मोठा निर्णय आला आहे. जयललिता यांची मालमत्ता बंगळुरुहून तामिळनाडूत परत आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

जयललिता तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या, त्यावेळेशी संबंधित प्रकरण आहे. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्यांचे सहकारी शशिकला, सुधाकरन आणि इलावरासी यांनाही आरोपी करण्यात आले होते. बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने त्यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली होती, मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली. नंतर सुप्रीम कोर्टाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली, पण निकालापूर्वीच जयललिता यांचा मृत्यू झाला.

तामिळनाडूला जयललिता यांची संपत्ती मिळणारशशिकला, सुधाकरन आणि इलावरासी यांनी बंगळुरू येथील परप्पाना अग्रहारा तुरुंगात त्यांची चार वर्षांची शिक्षा पूर्ण केली आणि तुरुंगातून बाहेर आले. त्यावेळी जयललिता यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्ता 2004 साली कर्नाटक सरकारच्या तिजोरीत वर्ग करण्यात आल्या होत्या. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 10,000 हून अधिक साड्या, 750 बूट, घड्याळे, सोने आणि हिऱ्यांचे दागिने आहेत.

आता बंगळुरू न्यायालयाने जयललिता यांच्याकडून जप्त केलेल्या 27 किलो दागिन्यांची आणि 1562 एकर जमिनीची कागदपत्रे तामिळनाडू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी पूर्ण होईल. जयललिता यांची मालमत्ता तामिळनाडूत परत येणे, ही दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, तामिळनाडू लाचलुचपत प्रतिबंधक पोलिस आवश्यक सुरक्षा, मूल्यांकन आणि व्हिडिओग्राफीसह या वस्तू गोळा करण्यासाठी पोहोचतील. या कामासाठी कर्नाटक पोलिसही सुरक्षा व्यवस्था पुरवणार आहेत. दागिन्यांचे मूल्यमापन करून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओग्राफीद्वारे रेकॉर्डिंग करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

 

टॅग्स :Courtन्यायालयTamilnaduतामिळनाडूKarnatakकर्नाटक