चेन्नई/बंगळुरू : तब्बल 21 दिवस कारागृहात घालवल्यानंतर अण्णाद्रमुकच्या सव्रेसर्वा ज़े जयललिता अखेर शनिवारी जामिनावर बाहेर आल्या़ बंगळुरूच्या परपन्ना अग्रहरा मध्यवर्ती तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर विशेष विमानाने जयललिता थेट चेन्नईत पोहोचल्या़ या वेळी चेन्नईत मुसळधार पाऊस सुरू होता़ पण या पावसातही अण्णाद्रमुकचे हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांनी जयललितांच्या स्वागतासाठी हजेरी लावली होती़
जयललितांच्या समर्थकांनी विमानतळापासून पोयस गार्डनस्थित जयललितांच्या शासकीय निवासस्थानार्पयत अनेक कि.मी. लांबीची मानवी शृंखला बनविली़ जयललितांच्या गाडीवर दुतर्फा फुलांची बरसात आणि ‘अम्मा’च्या जयघोषाने हा परिसर अक्षरश: दुमदुमून गेला होता़ पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी जोरदार जल्लोष करीत आनंद साजरा केला़ जयललितांची एक झलक पाहण्यासाठी तसेच त्यांच्या स्वागतासाठी चेन्नईच्या मुख्य रस्त्यांवर लोकांनी गर्दी केली होती़ ठिकठिकाणी जयललितांच्या स्वागतासाठी तोरणो आणि त्यांचे पोस्टर्स दिसत होते. (वृत्तसंस्था)