शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:54 IST

काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय रंग देण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरील कुरबुरी वाढवण्यात सुरुवात केली आहे.

जम्मू - काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय रंग देण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरील कुरबुरी वाढवण्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, आज जम्मूमधील कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. दरम्यान, भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.  

भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंततराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे. दरम्यान, आज सकाळी नियंत्रण रेषेजवळी कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. शहीद जवानाचे नाव नाईक रवी राजन कुमार सिंह असल्याचे समोर आले आहे.  तसेच पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे चार जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या आगळीकीमुळे नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने स्थानिक रहिवाशांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, पाकिस्तानकडून होत असलेल्या आगळीकीला भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर