शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

"आईसोबत तो ईद साजरी करायला आला होता"; ६ दिवसांसाठी मुंबईत आलेल्या जावेद खानचे कुटुंब संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:21 IST

लंडन येथून आईच्या उपचारासाठी आलेल्या जावेद अली यांच्या कुटुंबाचा अहमदाबाद विमान दुर्घटेनेत मृत्यू झाला.

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादच्या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानातील २४१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक चिमुरड्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये लंडन येथे राहणारे जावेद अली यांच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. जावेद हे पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईत आले होते. सर्व कामे आटपून परतत असतानाच विमान अपघात त्यांचे संपूर्ण कुटुंब संपले.

अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या १७१ मधील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जावेद अली या एनआरआय कुटुंबाचाही समावेश होता. मूळच मुंबईचे रहिवासी असलेले जावेद अली यांचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले. जावेद अली लंडनहून मुंबईत आले होते आणि त्यांच्या आईवर उपचार करून ते लंडनला जात होते. जावेद अली यांचे कुटुंब लंडनला परतण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाईट AI-१७१ मध्ये बसले होते. पण ही त्याच्या आयुष्यातील शेवटची फ्लाईट ठरेल याची कोणालाच कल्पना नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमान अपघातात जावेद अली (३७ वर्षे), त्यांची पत्नी मरियम अली (३५ वर्षे) आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. जावेदचा आठ वर्षांचा मुलगा झयान अली आणि चार वर्षांची मुलगी अमीन अली यांनाही आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. जावेद यांचे कुटुंबिय रुग्णालयामध्ये त्यांच्या जवळच्या लोकांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनाही अजूनही आशा आहे की, ते यातू बचावले असतील.

जावेद अली ६ दिवसांसाठी भारतात आला होता. तो त्याच्या आईच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आला होता. त्याची पत्नी लंडन येथीलच होती. त्यामुळे ते तिथेच स्थायिक झाले होते. "आईसोबत ईद साजरी करण्यासाठी जावेद मुंबईत आला होता. तिच्यावर सर्व उपचार करुन तो लंडनला जाण्यासाठी निघाला होता. तीन ते चार वर्षांनी तो इथे यायचा. ११ वर्षांमध्ये कधी महत्त्वाचे काम असल्याचे तो इथे यायचा. व्हिडीओ कॉलवर त्याचे आईसोबत रोज बोलणं व्हायचं," असं जावेदच्या भावाने सांगितले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया