तिरुअनंतपुरम: मुस्लिम डॉक्टरांना प्राधान्य अशी जाहिरात देणाऱ्या रुग्णालयाचा गीतकार जावेद अख्तर यांनी समाचार घेतला. मुस्लिम अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल, अशी जाहिरात एका रुग्णालयानं दिली होती. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. रुग्णालयानं दिलेली जाहिरात लज्जास्पद असल्याचं जावेद अख्तर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 'केरळमधील रुग्णालयाची कृती लज्जास्पद आहे. ही माणसं कोणत्या तोंडानं आणि नैतिकतेनं धर्मनिरपेक्षता आणि न्यायाची मागणी करतात. अशा प्रकारच्या जाहिरातींनी कोणत्याही नियमांचं किंवा कायद्याचं उल्लंघन कसं होतं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. कायदेतज्ज्ञांनी याबद्दल विचार करुन अशा कट्टरवाद्यांना न्यायालयात खेचायला हवं,' अशा शब्दांमध्ये अख्तर यांनी रुग्णालयाच्या जाहिरातीवर सडकून टीका केली.
लाज आणली; मुस्लिम डॉक्टरांना प्राधान्य देणाऱ्या रुग्णालयाचा जावेद अख्तर यांच्याकडून समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 21:06 IST