शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जावडेकर, निशंक यांना भोवली संघाची नाराजी, शैक्षणिक धोरणाला उशीर; ...म्हणून बदलांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 07:52 IST

कोरोना कालावधीत केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. विरोधकदेखील आक्रमक झाले.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी फेरबदल झाले असून काही मोठ्या मंत्र्यांची गच्छंती झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना संघाची नाराजी भोवली. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात झालेला विलंब व त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेवरून संघ पदाधिकाऱ्यांनी असमाधान व्यक्त केले होते. दुसरीकडे प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांच्या अनावश्यक वक्तव्यांमुळेदेखील संघाने नाराजी वर्तविली होती.कोरोना कालावधीत केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. विरोधकदेखील आक्रमक झाले. या कालावधीत मंत्रालयांमधील कामांपेक्षा काही मंत्री त्यांच्या वक्तव्यांसाठीच चर्चेत होते. जावडेकर, रविशंकर प्रसाद यांच्याकडून तर ट्विटर, टुलकिट इत्यादी प्रकरणांत अनावश्यक वक्तव्ये देण्यात आली, असे संघ पदाधिकाऱ्याचे मत होते. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी संघाचा अनेक दिवसांपासूनचा आग्रह होता.जावडेकर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्रिपदी असताना २०१६ ते २०१९ कालावधीत यादृष्टीने प्रभावी पावले उचलण्यात आली नव्हती. खुद्द सरसंघचालकांनी दोन वर्षांअगोदर विजयादशमीच्या भाषणात यासंदर्भात आम्हाला प्रतीक्षाच असल्याचे वक्तव्य केले होते. रमेश पोखरियाल निशंक यांच्या कालावधीत नवीन धोरण लागू झाले, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झालेली नाही. यामुळे संघात नाराजीचा सूर होता.  

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPrakash Javadekarप्रकाश जावडेकर