नवी दिल्ली : माजी संरक्षणमंत्री जसवंतसिंग हे घरी पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफेरल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
डोक्याला दुखापत झाल्यानंतर गुरुवारी रात्री 11 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते अत्यवस्थ असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. अर्थ आणि विदेश यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेले 76वर्षीय जसवंतसिंग यांनी या वर्षी राजस्थानच्या बाडमेरमधून लोकसभा निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्णय घेताच भाजपाने त्यांची हकालपट्टी केली होती. यात पराभूत झाल्यानंतर ते राजकारणातूनही बाहेर फेकले गेले होते.