शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जंतर मंतरवर आंदोलने बंद; जे करायचे, ते रामलीला मैदानातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 04:34 IST

राजधानी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी यापुढे कोणतीही राजकीय, सामाजिक आंदोलने, मोर्चे व घोषणाबाजी करता येणार नाही.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी यापुढे कोणतीही राजकीय, सामाजिक आंदोलने, मोर्चे व घोषणाबाजी करता येणार नाही. राष्ट्रीय हरित लवादाने तिथे यापुढे आंदोलनाला परवानी देऊ नये, असे आदेश दिल्ली सरकारला दिले आहेत. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी न्या. आर. एस. राठोड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज हा निर्णय घेतला.आता अशा प्रकारची आंदोलने दिल्लीच्या रामलीला मैदानावरच होऊ शकतील. आतापर्यंत सर्व प्रमुख आंदोलनांचे जंतर मंतर हेच ठिकाण होते. मात्र तिथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले व्यासपीठ, ध्वनिवर्धक यंत्रणा ताबडतोब हटवा, असेही आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकार, नवी दिल्ली महापालिका आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.जंतर मंतरवर होणाºया आंदोलनांमुळे पर्यावरणविषयक कायद्याचे उल्लंघन होते, प्रचंड ध्वनिप्रदूषण होते आणि स्थानिकांना त्याचा प्रचंड त्रास होतो, अशी याचिका दिल्लीतील एका रहिवाशाने आयोगापुढे केली होती. ते म्हणणे मान्य करून, हा आदेश देण्यात आला. जंतर मंतर परिसरातील सर्व कचरा एका महिन्यात हटवून, हा भाग स्वच्छ करावा, असे आयोगाने महापालिकेला सांगितले आहे.तेथील अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे आणि महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालय व विधान भवन भागाकडे मोर्चे नेण्यास बंदी घातली होती. पूर्वी मोर्चे काळा घोडा तसेच मंत्रालयापासून एक किलोमीटरवर अडवण्यात येत असत. काही वेळा तिथे धरणेही धरले जात असे. उच्च न्यायालयाने त्यांची दखल घेत मोर्चे, आंदोलने, धरणे हे आझाद मैदानापुरते मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले होते. अनेक वर्षांनी तसाच निर्णय दिल्लीसाठी राष्ट्रीय हरित आयोगाने दिला आहे.

टॅग्स :Jantar Mantarजंतर मंतर