शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रामबनमध्ये दरड कोसळल्यानं जम्मू-श्रीनगर हायवे बंद, 1500 वाहनं पडली अडकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 12:54 IST

रामबनमधल्या डिगडोलमध्ये दरड कोसळल्यामुळे काल रात्री श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरः रामबनमधल्या डिगडोलमध्ये दरड कोसळल्यामुळे काल रात्री श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करण्यात आला आहे. दरड कोसळून महामार्ग बंद झाल्यानं जवळपास 1500 वाहनं अडकून पडली आहेत. तर दुसरीकडे उधमपूरमध्ये शेकडोंच्या संख्येत वाहनांना थांबवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालक राजमार्ग उघडण्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु राजमार्ग अद्याप मोकळा करण्यात आलेला नाही. दिवसभर प्रवासी कडक उन्हात आणि गरमीमध्ये त्रासलेले होते.दरड कोसळल्यामुळे महामार्ग रात्री आठच्या सुमारास बंद ठेवण्यात आला आहे. बुधवारी रात्री रामबन भागातल्या डिगडोलमध्ये अचानक दरड कोसळल्यानं राष्ट्रीय राजमार्ग बाधित झाला. राजमार्ग बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रात्री राजमार्ग उघडण्याचं काम सुरू केलं आहे. परंतु अनेक तास प्रयत्न करूनही महामार्ग पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी उधमपूरहून काश्मीर खोऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रतिबंध घातला आहे.दरड कोसळल्यामुळे या राजमार्गावर 1500 वाहनं अडकून पडली आहेत. तर उधमपूरमध्ये शेकडो वाहनं खोळंबली आहेत. उधमपूरमधल्या जखैनी, भारतनगर, संगूर, रठियान, बट्टलबालियां, गरनई, मांड, टिकरीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहनांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनांत बसून प्रवासी ताटकळत आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर