शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir: आई-वडिलांचा आवाज ऐकताच दहशतवाद्यांनी केलं आत्मसमर्पण; पहा चकमकीचा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 17:08 IST

दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू असतानाही सुरक्षा दलांनी संयम बाळगला आणि त्यांच्यावर गोळीबार केला नाही. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना चकमक स्थळी आणले आणि त्यांनीच मुलांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले.

Lashkar Militants Surrender:जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या चकमकीदरम्यान, दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विशेष म्हणजे, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी त्यांच्या पालकांची मदत घेतली आहे. आई-वडिलांचा आवाज ऐकताच दहशतवाद्यांनी हत्यारे खाली ठेवली. ते अलीकडेच लष्कर फ्रंट-टीआरएफ गटात सामील झाले होते.

कुलगामचे एसएसपी डॉ. संदीप चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगामच्या हदिगाम गावात अज्ञात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता भारतीय लष्कर आणि जेकेपीने या भागात संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. बुधवारी पहाटे अडीच वाजता संशयित घरांची झडती घेत असताना चकमक झाली.

पहा व्हिडिओ-  या चकमकीत नव्याने भरती झालेले दोन स्थानिक तरुणही होते. नदीम अब्बास भट आणि कफील मीर अशी त्यांची नावे आहेत. दोघेही अलीकडेच दहशतवादी गटात भरती झाले होते. या माहितीनंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू असतानाही सुरक्षा दलांनी संयम बाळगला आणि त्यांच्यावर गोळीबार केला नाही. दोन्ही दहशतवाद्यांना घराच्या एका भागात कोंडून ठेवण्यात आले. यावेळी दोन्ही दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना चकमक स्थळी आणले. त्यांनी आपल्या मुलांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले.

पालकांच्या प्रयत्नाने जीव वाचलाअखेर सकाळपर्यंत पालक आणि सुरक्षा दलांकडून आत्मसमर्पण करण्याचे वारंवार केलेले आवाहन कामी आले आणि सकाळी दोन्ही दहशतवाद्यांनी शस्त्रे टाकून आत्मसमर्पण केले. या दोघांना नंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले, तर त्यांच्याकडून काही शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना कायदेशीर औपचारिकता आणि सुरक्षा तपासणी पूर्ण केल्यानंतर संबंधित कुटुंबांच्या ताब्यात देण्यात येईल. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी