शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Jammu & Kashmir: एकता यात्रेच्या २७ वर्षांनंतर कलम ३७० हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 02:46 IST

भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी ११ डिसेंबर १९९१ रोजी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत १५ हजार किमीची एकता यात्रा काढली होती.

नवी दिल्ली : भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी ११ डिसेंबर १९९१ रोजी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत १५ हजार किमीची एकता यात्रा काढली होती. काश्मीरच्या लाल चौकात भारतीय तिरंगा फडकाविणे हे त्यांचे लक्ष्य होते. या यात्रेत असे दोन चेहरे होते त्यातील एका व्यक्तीकडे संपूर्ण यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी होती. यातील एक चेहरा म्हणजे नरेंद्र दामोदारदास मोदी. तर, दुसरा चेहरा म्हणजे अमित शहा.भाजपसाठी कलम ३७० त्याच्या स्थापनेपासूनच प्रमुख मुद्दा राहिलेला आहे. याचे कारण असे की, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ३७० कलम हटवू इच्छित होते. हे लक्ष्य पूर्ण करण्यापूर्वीच त्यांचा काश्मीरमध्ये मृत्यू झाला. पहिल्या कार्यकाळातच पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी ३७० हटविण्यासाठी अध्ययन सुरु केले. राज्यातील मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी- भाजप सरकार स्थापनेचा एक मोठा उद्देश हाही होता की, कलम ३७० बाबत जनता आणि स्थानिक राजकीय पक्षांमध्ये काय विचार आहे याचा अभ्यास केला जावा. त्यानंतर हे सरकार कोसळले आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपमध्ये हे कलम हटविण्याबाबत विचार केला गेला. पण, त्यावेळी परिस्थिती अनुकूल नव्हती. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने असे ठरविले की, जर २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार आले तर, पहिल्या एक- दीड वर्षात या मुद्यावर निर्णय घेतला जावा.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी