शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

Jammu-Kashmir :जवानांनी पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना केलं ठार, शस्त्रास्त्रही केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 07:53 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी (28 नोव्हेंबर) रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली.

ठळक मुद्देपुलवामा चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्माजवानांनी दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रही घेतली ताब्यात दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी (28 नोव्हेंबर) रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शिवाय, दहशतवाद्यांकडील दारूगोळादेखील जप्त केला आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्यापपर्यंत ओळख स्पष्ट झालेली नाही.  

दरम्यान, बुधवारी बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये  जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद जटला कंठस्नान घातले. जम्मू काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येत नवीद जटचा सहभाग होता. 

पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय हद्दीत जास्तीत जास्त दहशतवाद्यांची घुसखोरी घडवण्याच्या प्रयत्नात आहे.  शिवाय, यावर्षी भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटमध्ये 241 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानं पाकिस्तान बिथरला आहे. गेल्या वर्षी जवानांनी 213 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

(पत्रकार शुजात बुखारींच्या हत्या प्रकरणातील दहशतवाद्याचा जवानांनी केला खात्मा)

गोळ्या झाडून बुखारींची हत्या'रायझिंग काश्मीर'चे संपादक सुजात बुखारी यांची श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. बाईकवरुन आलेल्या तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. कार्यालयातून बाहेर पडत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये बुखारी यांचा जागीच मृत्यू झाला. बुखारी यांच्या सरंक्षणासाठी असलेल्या दोन पोलिसांचाही गोळीबारात मृत्यू झाला. यापूर्वी, बुखारी यांच्यावर 2000 मध्ये हल्ला झाला होता. तेव्हापासून त्यांना संरक्षण देण्यात आले होते. 

काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मादक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी (24 नोव्हेंबर) मध्यरात्री सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. संशयित दहशतवादीम्हणून मारल्या गेलेल्या सहांपैकी पाच जण स्थानिक युवक होते. सहावा पाकिस्तानी नागरिक असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लगोलग करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.   

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय लष्कर