शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

'जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार...', कठुआ हल्ल्यानंतर सरकारचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:40 IST

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले.

Jammu-Kashmir Kathua Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सोमवार, 8 जुलै रोजी लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. 'आमच्या पाच जवानांच्या हत्येचा बदला घेणार आणि या दुष्ट शक्तींचा नाश करणार,' असा इशारा संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी दिला. 

दहशतवाद्यांना इशारासंरक्षण सचिवांनी म्हटले की, 'कठुआ जिल्ह्यातील बडनोटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या पाच शूर जवानांना वीरमरण आले. या सर्वोच्च बलिदानाबद्दल मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. त्यांनी देशासाठी केलेली निस्वार्थ सेवा सदैव स्मरणात राहील आणि त्यांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल. भारत या हल्ल्यामागील दुष्ट शक्तींचा नक्की नाश करेल.' संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही जवानांच्या बलिदानाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

दहशतवाद्यांनी हल्ला कसा केला?लष्कराचे वाहन कठुआच्या बडनोटा येथील डोंगराळ भागात गस्तीसाठी निघाले होते. एका बाजूला दरी असल्याने वाहनाचा वेगही कमी होता, त्याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. यावेळी टेकडीवर घात लावून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक वाहनावर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले, मात्र सर्व दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. या घटनेत एका अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद झाले, तर इथर 5 जखमी जवानांवर पठाणकोट मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीCentral Governmentकेंद्र सरकार