शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: गेल्या चार वर्षात जम्मू-काश्मीरमधील 700 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 21:56 IST

Jammu Kashmir: दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमधील 700 तरुणांची भरती केली असून, सध्या घाटीत 141 सक्रिय दहशतवादी आहेत.

Jammu Kashmir Terrorist: दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये 700 तरुणांची भरती केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीरात 141 सक्रिय दहशतवादी असून, त्यापैकी बहुतेकजण परदेशी आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या बाजूने घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत.

या संघटनांचे दहशतवादीकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 5 जुलै 2022 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 82 विदेशी दहशतवादी आणि 59 स्थानिक दहशतवादी सक्रिय होते. या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे दहशतवादी प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन याशिवाय लष्कर-ए-तैयबा आणि संलग्न संघटना द रेझिस्टन्स फ्रंट यासारख्या संघटनांतील आहेत.

विविध दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत J&K मध्ये 700 स्थानिक तरुणांची भरती केली आहे, त्यापैकी 2018 मध्ये 187, 2019 मध्ये 121, 2020 मध्ये 181 आणि 2021 मध्ये 142 तरुणांची भरती करण्यात आली होती. या वर्षी जून अखेरपर्यंत 69 तरुणांची दहशतवादी संघटनांनी भरती केली आहे.

125 दहशतवादी ठारसुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत 55 चकमकीत 125 दहशतवाद्यांना ठार केले आहे. तसेच, दोन सुरक्षा जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 23 जण जखमी झाले आहेत. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 20 नागरिकांचाही बळी गेलाय. आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये 146 दहशतवादी आणि 41 नागरिकांचा मृत्यू झाला आणि तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आपला जीव गमवावा लागला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी