शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Jammu & Kashmir: राज्यसभेत बहुमत नसूनही सरकारची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:27 IST

विरोधी ऐक्याचा फुगा फुटला; भाजपला मिळाली जवळपास सर्वच पक्षांची मदत

-  हरिश गुप्ता नवी दिल्ली : तिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या मतदानाच्या वेळी विरोधी ऐक्याचा फुगा फोडणाऱ्या मोदी सरकार व भाजपने जम्मू-काश्मीरविषयीचा प्रस्ताव त्याहून अधिक प्रचंड बहुमताने मंजूर करून दाखविला. त्यामुळे राज्यसभेत विरोधकांची संख्या अधिक आहे, या म्हणण्याला अर्थच राहिलेला नाही.बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी यांनी या प्रस्तावावर केंद्राला पाठिंबा दिलाच, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदानात सहभागी न होण्याचा अधिकृत निर्णय घेऊन सरकारला मदत केली आणि वायएसआर काँग्रेसचे दोन खासदारही राज्यसभेत सरकारच्या मदतीला धावून आले. मोदी सरकारला विरोध करणाऱ्या तेलगू देसमच्या दोन सदस्यांनीही विधेयकाच्या बाजूने मतदान केले.त्या आधीच काँग्रेसचे भुवनेश्वर कालिता व समाजवादी पक्षाच्या दोन सदस्यांचे राजीनामे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी स्वीकारले, तेव्हा राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २३९ वर आली. त्यामुळे भाजपची राजकीय सोयच झाली. तिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या वेळी भाजपच्या बाजूने ९९ सदस्यांनी मतदान केले होते, पण काश्मीरवरील मतदानाच्या वेळी भाजप व सरकारला १२५ मते मिळाली. तलाकविरोधी विधेयकाच्या मतदानाला गैरहजर राहणाऱ्या के. डी. सिंग यांना तृणमूलने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तरीही ते यावेळी गैरहजरच होते. त्या पक्षाचे पाच खासदार आज नव्हते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांमार्फत काही विरोधी खासदारांशी संपर्क केला होता. यावेळी मात्र ती जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपविली होती आणि शहा त्यात चांगलेच यशस्वी झाले.अनेक विरोधक गैरहजरप्रत्यक्ष मतदानाच्या वेळी विरोधी बाकांवरील तब्बल ५२ सदस्य गैरहजर होते. राष्ट्रवादी, जनता दल (सेक्युलर), पीडीपी, जनता दल (संयुक्त) यांच्याबरोबरच तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसचे काही खासदारही काही ना काही कारणास्तव तेव्हा सभागृहात नव्हते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370