शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

Jammu And Kashmir : पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:16 IST

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येत आहे. जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे.जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच याआधी काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये सुरू झाली आहेत. डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 5 ऑगस्ट रोजी ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता 25 दिवसांनी डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा ही अद्याप ठप्पच आहे.   

कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर हळूहळू निर्बंध हटवण्यात आले होते. याआधी जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा संथगतीने सुरू करण्यात आली होती. मात्र जम्मूमध्ये पसरवत येण्यात असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तातडीने बंद करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता. 

जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या विकासाची आखणी सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच नोकरभरती सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, आगामी दोन- तीन महिन्यात जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये सरकारी खात्यातील 50 हजार जागा रिक्त असून या जागेवर लवकरच मेगाभरती करणार आहे. त्यामुळे  या भरतीचा फायदा या राज्यातील तरुणांनी घ्यावा असे आवाहन मलिक यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसांत काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने काही मोठ्या घोषणा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

तसेच राज्यातील जनतेला विविध अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील परिस्थिती सुधारत असून तेथील निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी लॅडलाईन सेवा चालू करण्यात आली आहे, तर जम्मू मधील सर्व 10 जिल्ह्यांमधील मोबाईल सेवा देखील सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे हळूहळू इंटरनेट सेवाही पूर्वपदावर आणण्याचं आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMobileमोबाइलArticle 370कलम 370