शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 10:09 IST

J&K Assembly elections : २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये गेल्यावेळी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.

बऱ्याच कालावधीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी सोमवारी सांगितलं की, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार आहेत. दरम्यान, २०१४ पासून जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांचे आयोजन करण्यात आलेले नाही. तसंच, २०१९ मध्ये राज्यातून कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. यासह लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळं करण्यात आलं.

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांची भाजपनं जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारी जम्मूच्या बाहरीमध्ये एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी जम्मू-काश्मीरमधील विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केलं. तसंच. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था ISI च्या कारवायांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे, असंही केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं.

दरम्यान, २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. १९ जून २०१८ रोजी भाजपने पाठिंबा काढून घेतल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. मात्र, नंतर जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर, ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारनं कलम ३७० आणि ३५ अ हटवलं. यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून उपराज्यपाल यांच्याकडे राज्यकारभाराची जबाबदारी आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर