शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार देऊन मुलाकडून जम्मूत बॉम्बस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 04:46 IST

गुरुवारी जम्मू बसस्थानकातील बॉम्बहल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या हल्लेखोराचे वय सोळाहून कमी आहे.

जम्मू : गुरुवारी जम्मू बसस्थानकातील बॉम्बहल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या हल्लेखोराचे वय सोळाहून कमी आहे. बॉम्बहल्ला करण्यासाठी हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याने ५० हजार रुपये दिले होते, अशी कबुली या अल्पवयीन हल्लेखोराने दिली आहे. हल्लेखोराचे वय लक्षात घेता दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी लहान मुलांचा वापर सुरू केल्याचे संकेत मिळतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.हल्लेखोर मुलगा १२ मार्च रोजी सोळा वर्षांचा होईल. बसस्थानकात हातबॉम्बने हल्ला केल्यानंतर पळून जात असताना त्याला पकडण्यात आले होते. या हल्ल्यातील एका जखमीचा गुरुवारी मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन झाली आहे. गुरुवारी सकाळी ११.५० वाजता झालेल्या या हल्ल्यात उत्तराखंडचा मोहम्मद शरीक ठार झाला होता. चौकशीत या मुलाने पोलिसांना सांगितले की, हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याने बॉम्ब डागण्यासाठी ५० हजार रुपये दिले होते. आधार कार्ड, शाळेतील नोंद आणि ओळख पटविण्याच्या अन्य पुराव्यांनुसार त्याची जन्मतारीख १२ मार्च २००३ आहे. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याआधी त्याच्या वयाबाबत खातरजमा करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जाईल. (वृत्तसंस्था)>बॉम्बहल्ला करण्यास दिला होता नकारचौकशी अधिकाऱ्यांनुसार हिज्बुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कुलगाम जिल्ह्याचा प्रमुख फैयाज याने जम्मूत कोणत्याही वर्दळीच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी संघटनेचा भूमिगत कार्यकर्ता मुझम्मील याच्याकडे बॉम्ब सुपूर्द केला होता; त्याने बॉम्बहल्ला करण्यास नकार दिला. मग त्याला हा बॉम्ब छोटू असे सांकेतिक नाव असलेल्या मुलाकडे पोहोचता करण्यास सांगण्यात आले. छोटूचे छायाचित्रही मुझम्मील याला दाखविण्यात आले. छोटू सध्या पोलीस कोठडीत आहे. ज्याच्याकडे बॉम्ब दिला, तो हाच मुलगा असल्याचे मुझम्मीलने ओळखले.