शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये 24 दहशतवादी; सुरक्षा दल सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 09:02 IST

श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देश्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवादी उघडपणे परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत.जम्मू-काश्मीर पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी दहशतवादी आढळल्याची शक्यता नाकारली नाही.

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिसरातील दुकानदारांना हे दहशतवादी धमकी देत असल्याने सुरक्षा दलाची चिंता वाढली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी या परिस्थितीचा उपयोग नागरिकांना भडकावण्यासाठी करणार नाहीत यासाठी सुरक्षा दल सतर्क असून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे.

कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. पण जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. मात्र काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अद्याप बिकट आहे. श्रीनगर परिसरात अनेक ठिकाणी दहशतवादी आढळून आले आहेत. तसेच ते उघडपणे परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत. त्यांना दुकाने बंद ठेवण्यास आणि त्यांचा आदेश पाळण्यास सांगत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जम्मू-काश्मीर पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी दहशतवादी आढळल्याची शक्यता नाकारली नाही. पण ते उघडपणे फिरतात ही अतिशयोक्ती असल्याचं म्हटलं आहे. सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून दररोज सुरू आहे. या वर्षात पाकिस्तानने 2050 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये 21 भारतीयांना प्राण गमवावा लागला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवार एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. पाकिस्तानने आपल्या सुरक्षा दलांना शस्त्रसंधीचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे भारताने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखावी, असे आवाहन भारताकडून करण्यात आले आहे. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनं होणारी घुसखोरी रोखण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. 

 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर