शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 20:11 IST

S Jaishankar Pakistan Visit, Farooq Abdullah: एस जयशंकर यांच्या आधी गेल्या वेळी सुषमा स्वराज पाकिस्तानात गेल्या होत्या

S Jaishankar Pakistan Visit, Farooq Abdullah: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे शांघाय सहयोग संघटनेत ( SCO ) सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबरला पाकिस्तानला जाणार आहेत. जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही चांगली बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सामान्यत: अशा बैठकांमध्ये पंतप्रधान सहभागी होण्यासाठी जातात, पण सध्या आपले परराष्ट्र मंत्री जात आहेत याचा मला आनंद आहे. अब्दुल्ला पुढे म्हणाले की, मला आशा आहे जयशंकर हे SCO व्यतिरिक्तही काही गोष्टींवर चर्चा करतील. भारत-पाक या दोन्ही देशांमधील संबंध कसे सुधारावेत, द्वेष कसा कमी करता येईल आणि दोन्ही देशांमधील ऋणानुबंध कसे वाढवता येईल यावर ते बोलतील अशी आशा अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

काश्मीरमधील पत्रकारांशी बोलताना नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रमुखांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आणि इस्रायलचा निषेध केला. अब्दुल्ला म्हणाले, पश्चिम आशियातील परिस्थितीत इस्त्रायल ज्या प्रकारे लेबनान, सीरिया, इराण आणि पॅलेस्टाईनवर बॉम्बफेक करत आहे, ती बाब दुःखद आहे. जगाला वाचवायचे असेल तर युद्ध हा उपाय असूच शकत नाही. यात निष्पाप लोकांचा बळी जातो आहे.

गेल्या १० वर्षातील पहिला पाकिस्तान दौरा

परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तान दौरा हा गेल्या दशकातील कोणत्याही भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा पहिला दौरा असेल. गेल्या वेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हार्ट ऑफ एशिया परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेल्या होत्या. दोन्ही देशांमधील संबंध पाहता, द्विपक्षीय चर्चा होईल अशी आशा कमी आहे. मागच्या वेळी जेव्हा भारताने SCO चे आयोजन केले होते, तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो त्यात सहभागी होण्यासाठी आले होते, पण दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा झाली नव्हती.

इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी लष्कर तैनात करण्यात आले आहे. इस्लामाबादमध्ये ५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घटनेच्या कलम २४५ अंतर्गत लष्कर तैनात करण्यात आले आहे. लष्कराच्या तैनातीमागे दोन कारणे सांगितली जात आहेत. पहिले म्हणजे SCO ची शिखर परिषद आणि दुसरे म्हणजे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने केलेला विरोध. त्यामुळे पाकिस्तानच्या राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतPakistanपाकिस्तानFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला