शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरची विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोदींनी केली मोठी घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 21:04 IST

यावेळी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोठी घोषणा केली.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबत घेतेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोठी घोषणा केली. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असला तरी येथे विधानसभा असेल. तसेच काश्मिरी जनतेला आधीप्रमाणेच आपले लोकप्रतिनिधी निवडता येतील, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. नरेंद्र मोदी म्हणाले की, ''फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तानमधून भारतात आले. मात्र  त्यावेळी काश्मीरमध्ये गेलेल्या निर्वासितांना अद्याप मताधिकार मिळालेला नाही. आज या संबोधनामधून मी जम्मू काश्मिरी जनतेला आश्वस्त करून इच्छितो की, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश घोषित झाला असला तरी येथे विधानसभा असेल आणि मुख्यमंत्रिही असेल. तसेच येथील जनता पूर्वीप्रमाणेच आपले आमदार निवडून देऊ शकतील. जम्मू-काश्मीरमधील व्यक्तींना पूर्ण पारदर्शकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडता येईल. तसेच लवकरच येथे निवडणुका होतील, अशी माहिती मोदींनी दिली.

 यावेळी  मोदींनी जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यामागचे कारण सांगितले. आज देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जम्मू काश्मीरला केंद्र सरकारच्या अखत्यारित ठेवण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. काही काळापूर्वी काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यापासून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जम्मू काश्मीरसाठी आखलेल्या कागदावरील योजना प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत. प्रशासनामध्ये गतिशिलता आली आहे. तसेच विविध विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे. विशेषकरून रस्तेबांधणी, रेल्वेसारखे प्रकल्प मार्गी लागत आहेत.'' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर