शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 11:32 IST

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी सकाळी चकमक सुरू झाली.चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर दोन जवान शहीद झाले आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (12 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर दोन जवान शहीद झाले आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.  

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. पुलवामामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. 

दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराने रविवारी (10 फेब्रुवारी) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. केलम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना शनिवारी (9 फेब्रुवारी) उशिरा रात्री मिळाली होती. यानंतर 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलम गावाला घेराव घातला आणि परिसरात शोध मोहीम करण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त 

रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या आसपास सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशनच्या 6 तासांनंतर जवानांनी दहशतवादी ज्या घरात लपले होते, ते घरच स्फोटकांनी उडवले.  या कारवाईदरम्यान, 5 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सध्या जवानांकडून परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. शोध मोहिमेदरम्यान जवानांनी दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा आणि अन्य साहित्यही जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका मोस्ट वॉन्डेट दहशतवादी कमांडरचाही सहभागी असू शकतो. मात्र भारतीय लष्कराकडून याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी