शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांनंतर जम्मू-काश्मिरात निवडणूक; तीन टप्प्यांत मतदान, हरयाणात एकच टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 07:33 IST

४ ऑक्टोबरला निकाल, आयोगाची घोषणा

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दहा वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये ९० जागांसाठी येत्या १८ सप्टेंबर रोजी तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच हरयाणामध्ये ९० जागांसाठी येत्या १ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकांचे निकाल ४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येतील. ही घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी केली. 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम २०१९ साली केंद्र सरकारने रद्द केले. त्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात सरकार निवडण्यासाठी प्रथमच निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले की, यंदा व पुढील वर्षाच्या प्रारंभी आणखी काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरचा विषय २०१९-२० या कालावधीत उपस्थित झाला नव्हता. पण आता चित्र बदलले आहे. त्यामुळे दोन-दोन राज्यांत एकत्र विधानसभा निवडणुका घेण्याचे धोरण निवडणूक आयोगाने अवलंबिले आहे. 

जम्मू-काश्मिरात असा आहे निवडणूक प्रवास

- तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात सत्तेवर असताना २००२ साली सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये चार टप्प्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. - तिथे २००८मध्ये नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत सात टप्प्यांत तसेच २०१४मध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. जम्मू-काश्मीर आता राज्य नसून केंद्रशासित प्रदेश आहे.

महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली यांचे वेळापत्रक कधी?

महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली येथील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जम्मू-काश्मीर, हरयाणातील विधानसभा निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर म्हणजे ४ ऑक्टोबरनंतर निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये याआधीची विधानसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर २०१४मध्ये पाच टप्प्यांत पार पडली होती.

कोणत्या राज्यात कुणाचा प्रवास खडतर?

हरयाणामध्ये प्रस्थापितविरोधी जनमत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपसाठी त्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा प्रवास खडतर ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या राज्यात भाजपने मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून तिथे नायबसिंह सैनी यांना विराजमान केले. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकांत जम्मूमध्ये दोन जागा जिंकणाऱ्या भाजपला जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांत उत्तम यश मिळेल असा विश्वास वाटत आहे. खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्सने लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या होत्या. पाचव्या जागेवर अपक्ष उमेदवार अब्दुल रशीद शेख यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला होता.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Jammu Kashmirजम्मू-काश्मीरHaryanaहरयाणा