शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 19:12 IST

Jammu and Kashmir Election 2024 : निवडणूक आयोग पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोग पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यात निवडणुका होऊ शकतात. या आठवड्याच्या अखेरीस निवडणूक आयोग केंद्रीय गृह मंत्रालयासोबत बैठक घेणार आहे. 

या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबत आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी तारीख जाहीर करण्याचा अंतिम निर्णय घेईल. निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोगानं निवडणूक तयारीसाठी ८ ते १० ऑगस्टदरम्यान श्रीनगर आणि जम्मूचा दौरा केला आहे. 

दरम्यान, २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. १९ जून २०१८ रोजी भाजपनं पाठिंबा काढून घेतल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. नंतर जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 

यानंतर, ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारनं कलम ३७० आणि ३५ अ हटवलं होतं. तसंच, जम्मू आणि काश्मीर राज्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून उपराज्यपाल यांच्याकडे राज्यकारभाराची जबाबदारी आहे.

निवडणूक आयोगाच्या मते, उत्तर काश्मीरच्या जिल्ह्यांमध्ये अनेक आव्हाने आहेत. येथील अनेक भाग संवेदनशील मानले जातात. उत्तर काश्मीरमधील अनंतनाग, बारामुल्ला, बडगाम, बांदीपोर, गंदरबल, कुपवाडा, कुलगाम, पुलवामा, शोपियाँ आणि श्रीनगर जिल्हे संवेदनशील मानले जातात. तर जम्मूमध्ये कठुआ, सांबा, रियासी, जम्मू, उधमपूर हे जिल्हे संवेदनशील मानले जातात.

विधानसभा निवडणूक लढवणार - फारुख अब्दुल्ला जम्मू-काश्मीरमध्ये आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे सांगण्यास फारुख अब्दुल्ला यांनी नकार दिला. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स स्वबळावर सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग