शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Jallianwala Bagh massacre:: ब्रिटिश राजवटीच्या अंताला प्रारंभ, १०२ वा स्मतिदिन; ब्रिटिशांनी केली होती फक्त ३७९ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 07:15 IST

Jallianwala Bagh massacre: १३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या. 

अमृतसर : जालियानवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल रोजी १०२ वर्षे झाली. १९१९ मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या या नरसंहारात हजारो लोक मारले गेले, तरी ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांमध्ये फक्त ३७९ जणांच्या हत्येची व १२०० लोक जखमी झाल्याची नोंद केली गेली. हा नरसंहार ब्रिटिश भारताच्या इतिहासातील काळा अध्‍याय आहे. १३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या. हे हत्याकांड झाले तो  दिवस बैसाखी होती. या नरसंहारानंतर ब्रिटिश राजवटीच्या शेवटास सुरुवात झाली. नंतर देशाला उधम सिंहसारखा क्रांतिकारी मिळाला आणि भगत सिंग यांच्यासह अनेक युवकांच्या हृदयात देशभक्तीची लाट निर्माण झाली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यातूनच देशातील अनेक क्रांतीकारी तरुण ब्रिटीश राजवटीविरुद्ध एकवटले.

१० मिनिटे गोळीबार केला, १६५० फैरी झाडल्या... जालियानवाला बाग प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून दीड किलोमीटरवर आहे. १३ एप्रिल रोजी रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी सभा सुरू होती. या बागेत अनेक वर्षांपासून बैसाखीच्या दिवशी मेळाही व्हायचा. त्यात भाग घेण्यासाठी त्या दिवशी शेकडो लोक आले होते.जनरल डायर ९० सैनिकांसह तेथे आले व त्यांनी बागेला घेराव घालून कोणताही इशारा न देता नि:शस्त्र जमावावर गोळीबार सुरू केला. तेथून बाहेर पडण्याचा मार्ग खूप अरुंद होता व सैनिकांनी तो अडवून ठेवला होता. त्यामुळे अनेकांचा जीव गेला.डायर यांच्या आदेशावर ब्रिटिश लष्कराने न थांबता १० मिनिटे गोळीबार केला. १६५० फैरी झाडल्या गेल्या. गोळ्या संपल्यानंतरच तो थांबला, असे सांगितले जाते.अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या. त्या विहिरीला हुतात्मा विहीर म्हटले जाते. विहिरीत १२० मृतदेह सापडले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माहितीनुसार एक हजारांपेक्षा जास्त लोक हुतात्मा झाले व १५०० पेक्षा जास्त जखमी झाले.जनरल डायर रॉलेट कायद्याचे कट्टर समर्थक होते म्हणून त्यांना त्याला विरोध मान्य नव्हता. त्यांचा समज होता की, या नरसंहारानंतर भारतीय घाबरून जातील; परंतु ब्रिटिश सरकारविरोधात पूर्ण देशात आंदोलन निर्माण झाले.

टॅग्स :Jallianwala Bagh massacreजालियनवाला बाग हत्याकांड