शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर रुग्णसंख्या वाढली : केळी व कांद्याला फटका तर गहू, हरभर्‍याला लाभदायक

By admin | Updated: January 22, 2016 00:09 IST

जळगाव : उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर येऊन पोहचला. मकरसंक्रातीनंतर परतलेल्या थंडीमुळे केळी व कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर गहू व हरभर्‍याला मात्र लाभदायक ठरणार आहे. बदलणार्‍या वातारणामुळे सर्दी व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

जळगाव : उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर येऊन पोहचला. मकरसंक्रातीनंतर परतलेल्या थंडीमुळे केळी व कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर गहू व हरभर्‍याला मात्र लाभदायक ठरणार आहे. बदलणार्‍या वातारणामुळे सर्दी व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणारे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेर गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे.
आठ दिवसात पाच सेल्सीअसने पारा घसला
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थंडीचा जोर कायम होता. त्यानंतर जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत उन्हाचे चटके जाणवू लागले. मकरसंक्रांतीनंतर थंडी कमी होऊन उन्हाचा तडाका जाणवायला सुरुवात होते. मात्र १६ तारखेपासून उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या दरम्यान तापमाचा पारा किमान पाच सेल्सीअस अंशानी घसरला आहे.
वातावरण बदलामुळे रुग्णसंख्या वाढली
जानेवारीच्या पंधरवड्यात उष्ण आणि त्यापाठोपाठ थंड हवामानामुळे सर्दी व तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे. फ्ल्यू, मलेरिया तसेच हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. वातावरण बदलामुळे घश्याच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील ओपीडीमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.
केळी व कांद्याच्या पिकाला फटका
या थंडीचा केळी आणि कांद्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगासाठी हे वातावरण लाभदायक असल्याने केळीवर करपा व सरका या रोगाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. तर कांद्यावरदेखील करपा रोगाचा प्रार्दुभाव असण्याची शक्यता आहे. करपा व सरका या रोगांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी बुरशीनाशकाची फवारणी करावी असे तज्ज्ञांनी सुचविले आहे. वाढत्या थंडीचा गहू व हरभर्‍यासह कोरडवाहू पिकांना मात्र चांगला लाभ होणार आहे. यावर्षी जिल्‘ात अत्यल्प पाऊस झाल्याने गव्हाचे क्षेत्र केवळ २० हजार हेक्टरवर आहे. थंडीमुळे जमिन ओलसर राहणार असल्याने त्याचा लाभ गव्हाला होणार आहे. यासह रब्बी ज्वारीलादेखील याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्‘ातील तापमान

जळगाव८
भुसावळ८
अमळनेर११
बोदवड११
भडगाव११
चोपडा८
चाळीसगाव९
धरणगाव११
एरंडोल१०
फैजपूर१२
जामनेर८
मुक्ताईनगर१२
पारोळा१२
पाचोरा११
रावेर१२
सावदा१२
वरणगाव१२
यावल८