शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

अल्लाच्या कृपेनं...; जैश उल हिंदनं स्वीकारली इस्रायली दुतावासाजवळच्या स्फोटाची जबाबदारी

By कुणाल गवाणकर | Updated: January 30, 2021 13:56 IST

इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या हल्ल्याचा तपास सुरू

नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत असलेल्या इस्रायलच्या दुतावासाजवळ शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. जैश उल हिंद नावाच्या संघटनेनं दुतावासाजवळ हल्ला घडवून आणल्याचा दावा केला आहे. टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश उल हिंदनं हा दावा केल्याचं सांगितलं जात आहे. '...ये तो बस ट्रेलर है'; दिल्ली स्फोटाबाबत मोठा खुलासा, लिफाफ्यातून समोर आलं 'इराण कनेक्शन''सर्वशक्तिमान अल्लाच्या कृपेनं आणि मदतीमुळे जैश उल हिंदचे सैनिक चोख बंदोबस्त असलेल्या दिल्लीतील परिसरात शिरले. त्यांनी आयईडी स्फोट घडवला. भारतातील प्रमुख शहरांना हल्ला घडवण्याची ही सुरुवात आहे. भारत सरकारकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारांचा हा बदला आहे,' असा मेसेज टेलिग्रामवरून करण्यात आला आहे.दिल्ली स्फोट - इस्रायली दूतावासाबाहेर पोलिसांना सापडले बंद पाकीट, CCTV तूनही पुरावे हाती इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाची तीव्रता फार नव्हती. या स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आला. स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या घटकांची दोनवेळा तपासणी करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये हाय ग्रेड मिलिट्री एक्स्लोसिव्ह PETN (pentaerythritol tetranitrate) आढळून आले आहेत. अशा प्रकारची स्फोटकं अल-कायदासारख्या प्रशिक्षित संघटनांकडे असतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये, बंगाल दौरा रद्द; दिले असे निर्देशआयसिसच्या एका समूहानंदेखील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचा दावा केला आहे. मात्र सुरक्षा संस्थांना यावर विश्वास नाही. इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटानंतर काल इराणहून आलेल्या एका विमानातील सर्व प्रवाशांची चौकशी करण्यात आली. विमानाची तपासणी केली गेली. मात्र काहीही संशयास्पद आढळून आलं नाही.स्फोटामुळे काही गाड्यांचं नुकसानइस्रायलचा दूतावास दिल्लीतील अतिसुरक्षित भागात येतो. या भागात काल झालेल्या स्फोटामुळे काही गाड्यांचं नुकसान झालं. त्यांच्या काचा फुटल्या. खळबळ माजवण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता सुरुवातीला व्यक्त केली गेली. त्यानंतर पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक स्फोटाचा तपास करत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

टॅग्स :Israelइस्रायल