शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

NDRF चे काका तुम्ही मला कधी बाहेर काढणार? बोअरवेलमध्ये अडकलेल्या चेतनाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:31 IST

राजस्थानमधील कोटपुतली येथील किरतपुरा गावात बोअरवेलमध्ये अडकलेली चिमुकली चेतना अजूनही तिला बाहेर काढण्यासाठी आलेल्या काकांची वाट पाहत आहे.

राजस्थानमधील कोटपुतली येथील किरतपुरा गावात बोअरवेलमध्ये अडकलेली चिमुकली चेतना अजूनही तिला बाहेर काढण्यासाठी आलेल्या काकांची वाट पाहत आहे. गेल्या दोन दिवसापासून तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नाही आणि पाण्याचा एक थेंबही गेलेला नाही. चिमुकली बोअरवेलमधून बाहेर पडावी, अशी प्रार्थना देश करत आहे. चेतना ७०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली असून दोन दिवस झाले आहेत. 

NDRF चे काका, तुम्ही मला कधी बाहेर काढणार? असा प्रश्न बोअरवेलमध्ये अडकलेल्या चेतनाला पडल्य़ाचं म्हटलं जात आहे. चेतनाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी NDRF आणि SDRF टीमने हुकचा वापर केला. मात्र यश न आल्याने समांतर खोदकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी हरियाणातून मशीन आणेपर्यंत बचावकार्य थांबवण्यात आलं. चिमुकली बोअरवेलमध्ये अडकल्याचं पाहून कुटुंबीय दु:खी झाले आहेत. आधीच विलंब होत असून आता मशिनच्या प्रतीक्षेत विलंब होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

सोमवारी दुपारी २ वाजता चेतना खेळत असताना ७०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. चेतना दीडशे फुटांवर बोअरवेलमध्ये अडकली. यानंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं. चेतनासाठी प्रथम ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. यानंतर बोअरवेलमध्ये अडकलेल्या चेतनाच्या हालचालींवर कॅमेऱ्यांद्वारे देखरेख सुरू करण्यात आली. मंगळवारी दुपारी चेतना १२० फुटांवर पोहोचली. मात्र त्यानंतर अडचण सुरू झाली, बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्याचा निर्णय घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी दौसा येथे आर्यन नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता, त्याला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले होते. ही बचाव मोहीम यशस्वी झाली नाही. कारण आर्यनचा बोअरवेलमध्ये मृत्यू झाला होता. आर्यन केवळ ऑक्सिजनच्या मदतीने सुमारे ५० तास जिवंत राहिला. त्याला ना अन्न मिळालं , ना पाणी. आर्यनला वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने आधी घरगुती उपायाचा अवलंब केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. यानंतर त्यांनी बोअरवेलला समांतर नवीन खड्डा खोदण्यास सुरुवात केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान