शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! 2 वर्षांचा चिमुकला सतत रडायचा; रिपोर्ट पाहून डॉक्टरांना मोठा धक्का, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 12:06 IST

पालक जेव्हा मुलाला रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा त्यांना सत्य ऐकून मोठा धक्काच बसला. मुलाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले.

नवी दिल्ली - लहान मुलांक़डे दुर्लक्ष करणं कधी कधी महागात पडू शकते. काही वेळा ते त्यांच्या जीवावर देखील बेततं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्याला गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. तो सतत रडायचा. यासाठी त्याचे पालक जेव्हा त्याला रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा त्यांना सत्य ऐकून मोठा धक्काच बसला. मुलाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. कारण या मुलाच्या लिव्हरमध्ये चक्क एक सुई अडकली होती. ज्यामुळे त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. डॉक्टरांना ही सुई बाहेर काढण्यात आता यश आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एक मजूर दाम्पत्य आपल्या 2 वर्षांच्या मुलाला घेऊन रुग्णालयात गेलं होतं. तिथे त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्यानंतर उपचारासाठी मुलाला तिथून सवाई मान सिंह रुग्णालयात पाठवण्यात आलं. डॉ. अनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकल्याला काही दिवसांपूर्वी जयपूरच्या हॉस्पिटलमधून पाठवण्यात आलं होतं. त्याचे एक्स-रे, सिटी स्कॅन आणि इतर रिपोर्ट पाहिले. त्यात सुरुवातीला सुई फुफ्फुसाजवळ अडकल्याचं दिसलं. 

लिव्हरमधून जवळपास 2 इंच लांब सुई काढली

जेव्हा डॉक्टर ऑपरेशन करायला गेले तेव्हा सुई तिथून लिव्हरमध्ये गेली होती. त्यामुळे ऑपरेशनची जागा बदलावी लागली. मुलाच्या लिव्हरमधून जवळपास 2 इंच लांब सुई काढली. तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ हे ऑपरेशन सुरू होतं. लिव्हरमधून सुई काढण्याचं हे पहिलं प्रकरण आहे, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. याआधी मटार किंवा शर्टाचं बटण आणि इतर लहान वस्तू मुलांनी गिळल्याचे प्रकार समोर आले आहेत. पण अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

सुई दोन वर्षांच्या मुलाच्या शरीरात नेमकी गेली तरी कशी यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. कारण जर त्याने तोंडातून सुई गिळली असती तर ती त्याच्या पोटातून आतड्यात जाऊन तिथं हानी पोहोचली असती. सुई फुफ्फुसातून लिव्हरमध्ये गेली आणि तिथे अडकली. पालकांनाही ही सुई मुलाच्या शरीरात कशी गेली याची माहिती नाही. मुलाचं ऑपरेशन करण्यात आलं असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :doctorडॉक्टर