अल्पवयीन मुलीस पळविणारा कारागृहात
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
अकोला - अल्पवयीन मुलीला पळवून जबलपूर येथे नेणार्या आरोपीस शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. प्रवीण घोडेस्वार नामक युवकाने शहरातील एका अल्पवयीन मुलीला जबलपूर येथे पळवून नेले होते. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर प्रवीण घोडेस्वार व अल्पवयीन मुलीस जबलपूरमधील गोहलपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका वस्तीतून अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्याने त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.