शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम! अयोध्येतील रामललाचे फोटो आले समोर; राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवली मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:23 IST

अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवलेल्या रामललाच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत.

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवलेल्या रामललाच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये रामललाचे संपूर्ण रूप पाहायला मिळते. तसेच रामललाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असून फुलांचा हार घालण्यात आला आहे. २२ जानेवारीला राम लल्लाला अभिषेक केला जाईल, त्यानंतर डोळ्यांची पट्टी काढली जाईल. २३ जानेवारीपासून सर्वसामान्यांनाही मंदिरात जाता येणार आहे.

गुरुवारी नव्याने बांधलेल्या मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकूण चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. भगवान रामाची ही मूर्ती मंत्रोच्चार आणि पूजाविधीसह पीठावर ठेवली होती. यावेळी शिल्पकार योगीराज यांच्यासह अनेक संत उपस्थित होते.

बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीत वेगवेगळ्या विधींनी सुरुवात झाली. प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजा देखील झाली. अयोध्येतील नवीन मंदिरात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने याची सांगता होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनुष्ठान सुरू झाले असून ते अभिषेक समारंभापर्यंत सुरू राहील. अकरा पुजारी सर्व देवी-देवतांना आवाहन करून विधी करत आहेत, असे राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सांगितले. 

प्रायश्चित, कर्मकुटी पूजा कशासाठी? 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी अनावधानाने काही चुका झाल्यास किंवा आतापर्यंतच्या एकूण कार्यात कमतरता राहिल्यास त्याबाबतचे प्रायश्चित म्हणून ही पूजा केली जाते. कर्मकुटी पूजा म्हणजे यज्ञशाळा पूजन होय. यामध्ये भगवान विष्णूंना आवाहन करून त्यांच्याकडून मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळविली जाते.

२२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या