शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जय मार्कंडेय़़़ जय जय मार्कंडेय डॉल्बीचा दणदणाट : पावसाच्या सरी झेलत पार पडला रथोत्सव, तरुणाईच्या उत्साहाला उधाण

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

सोलापूर : उंट, घोडे.. महर्षींची पालखी.. मागोमाग लक्ष वेधून घेणारा रथ.. तरुणाईचा कलाविष्कार.. मधूनच पावसाच्या सरी झेलत ‘जय मार्कंडेय.. जय जय मार्कंडेय’च्या जयजयकारात निघालेल्या रथोत्सवाने पूर्व भागातील भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटल़े

सोलापूर : उंट, घोडे.. महर्षींची पालखी.. मागोमाग लक्ष वेधून घेणारा रथ.. तरुणाईचा कलाविष्कार.. मधूनच पावसाच्या सरी झेलत ‘जय मार्कंडेय.. जय जय मार्कंडेय’च्या जयजयकारात निघालेल्या रथोत्सवाने पूर्व भागातील भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटल़े
शनिवारी सकाळी 10़30 वाजता सिद्धेश्वर पेठेतील मंदिरातून वाजतगाजत रथोत्सव निघाला़ प्रारंभी व्यंकटेश सिंदम यांच्या हस्ते भगवान मार्कंडेय यांच्या मूर्तीला महारुद्राभिषेक करण्यात आला़ त्यानंतर लक्ष्मीनारायण कमटम यांच्या हस्ते होमहवन करण्यात आल़े संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य पुरोहित संघमचे अध्यक्ष रामलू र्शीराम पंतलू यांनी केल़े मिरवणुकीपूर्वी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, उपाध्यक्ष बालराज बोल्ली, सरचिटणीस सुरेश फलमारी, सहचिटणीस संतोष सोमा, पुरुषोत्तम उडता, सत्यनारायण बोल्ली, अंबाजी गुर्रम, जनार्दन कारमपुरी, विजय नक्का, अँड़ रामदास सब्बन, हरिबाबू येले, प्रा़ वसंत सोमा, रामचंद्र जन्नू, पेंटप्पा गड्डम, दशरथ गोप, पांडुरंग दिड्डी, हरिदास पोटाबत्ती, र्शीनिवास क्यातम, अशोक यनगंटी यांची प्रमुख उपस्थिती होती़ याशिवाय मिरवणुकीवेळी नगरसेविका कुमुद अंकाराम, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, विठ्ठल कोटा, अंबादास बिंगी, नागनाथ मादगुंडी, अशोक इंदापुरे, सत्यनारायण गुर्रम, रायमल्लू कमटम, सिद्राम जिंदम, शशिकांत कैंची, किसन र्शीराम, रायेशम कुरापाटी, डॉ़ राजेंद्र गाजूल, र्शीनिवास दिड्डी, प्रभाकर चिप्पा, महांकाळी येलदी, नागबाबू कुडक्याल, नागेश पासकंटी, नागनाथ गज्जम, गणेश गड्डम, दत्तात्रय यन्नम, र्शीनिवास मॅकल, सुदर्शन शहा यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होत़े (प्रतिनिधी)
मंदिरातील सजावटीला लागले 24 तास
रथोत्सवाच्या आदल्या दिवशी दरवर्षी मंदिर फुलांनी सजवण्याची परंपरा आह़े हजारो किलो फुले सजावटीसाठी लागतात़ शुक्रवारी दिवस-रात्र एक करून मंदिरात फुलांचा साज करण्यात आला़ दहा कारागिरांनी मंदिर सुशोभीकरणाचे काम पार पाडल़े फुलांची सजावट आणि त्याच्या सुगंधाने भक्तांचे मन प्रसन्न करवून सोडल़े
पावसाने लावली हजेरी
दुपारी 3़45 वाजता मिरवणूक बालाजी मंदिर परिसरात आली आणि इतक्यात पावसाने हजेरी लावली़ पावसाच्या सरी अंगावर घेत तरुणाईने आपला कलाविष्कार सादर केला़ या पावसातच ढोल-ताशांचा दणदणाट, डॉल्बी सुरू राहिला़ उलट पावसाने वातावरणात उत्साहाचा रंगच भरला़
35 संघटना, मंडळांचा सहभाग
या रथोत्सवात यंदाही जवळपास 35 संघटना, मंडळांचा सहभाग होता़ यामध्ये नृत्य सादर करणारे मंडळ सर्वाधिक सहभागी झाले होत़े ओम साई प्रतिष्ठान, दत्तात्रय लेझीम संघ, ओंकार डान्स ग्रुप, स्वामी विवेकानंद शक्ती प्रयोग मंडळ, पद्मवंशीय मार्कंडेय प्रतिष्ठान, टीआरजी डान्स ग्रुप, न्यू डी डान्स ग्रुप, विश्व प्रतिष्ठान, आंध्रदत्त लेझीम संघ, आरकाल मित्र परिवार, मार्कंडेयराज प्रतिष्ठान, ज़े डी़ मित्रमंडळ डान्स, शिवमार्कंडेय प्रतिष्ठान नवीपेठ, संस्कृती मंडळ अशा अनेक मंडळांनी सहभाग नोंदवत आपला कलाविष्कार दाखविला़