शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 23:08 IST

Jagannath Rath Yatra June 2025: भगवान बलभद्र यांचा तलध्वज रथ ओढण्यात गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

Jagannath Rath Yatra June 2025: आषाढ शुद्ध द्वितीयेला पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रा असते. २७ जून २०२५ रोजी सकाळी रथयात्रा सुरू झाली. परंतु, या रथयात्रेला गालबोट लागले आहे. प्रचंड जनसमुदारामुळे येथील व्यवस्था फोल ठरली. प्रचंड गर्दीमुळे तब्बल ६०० जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेनंतर रथयात्रा थांबवण्यात आली असून, उद्या पुन्हा रथ ओढण्याचे काम सुरू होईल, असे म्हटले जात आहे.

मिळालेल्या महितीनुसार, महाप्रभु जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी झाल्यामुळे जखमी झाले. आरोग्याच्या समस्यांमुळे ६०० हून अधिक भाविकांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे वृत्त आहे. यामुळे रथयात्रेला उशीर झाला. विशेषतः भगवान बलभद्र यांचा तलध्वज रथ ओढण्यात गोंधळ निर्माण झाला. रथयात्रेच्या मार्गावरील एका वळणावर रथ ओढण्यात खूप अडचण आली. ज्यामुळे रथयात्रा मंदावली. रथ ओढणे थांबल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक एकाच ठिकाणी जमा झाले. मोठ्या प्रमाणात रथयात्रेत आलेले लोक प्रतिबंधित क्षेत्रात घुसले. यामुळे रथांच्या सुरळीत हालचालीत मोठा अडथळा निर्माण झाला. गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती. प्रचंड जनसमुदायामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली. या गोंधळामुळे मोठ्या संख्येने भाविक अस्वस्थ झाले. शेकडो भाविकांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली. त्यापैकी शेकडो लोकांवर पुरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात आले. रथ ओढताना संपूर्ण रथयात्रा मार्गावर या घटना घडल्या. सुदैवाने, चेंगराचेंगरी झाली नाही आणि कोणीही जीवितहानी झाली नाही, असे सुरक्षा यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

जगन्नाथ रथयात्रेदरम्यान अनेक भाविक बेशुद्ध पडले. काही जण जखमी झाले. ओडिशाचे मंत्री मुकेश महालिंग यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रथयात्रेतील घटना कदाचित अति उष्णतेमुळे आणि आर्द्रतेमुळे झाली असावी. परंतु बचाव पथकाने तातडीने मदत केली. त्यांना रुग्णालयात नेले. भगवान जगन्नाथ मंदिराजवळ प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पिण्याचे पाणी आणि ग्लुकोजची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरेशी वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी मी स्वतः आलो आहे. रुग्णालयात जाऊनही भेट देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, जगन्नाथ रथयात्रेसाठी देशासह जगभरातून लाखो भक्त पुरी येथे पोहोचतात. जगन्नाथ मंदिरापासून सुमारे २.५ किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरापर्यंत बलराम, सुभद्रा आणि जगन्नाथ यांचे रथ हातांनी ओढून नेतात. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा एक आठवडा गुंडीचा मंदिरात राहतात, असे सांगितले जाते. 

 

टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राOdishaओदिशा