शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

300 रूम, 200 कोटींचा खर्च अन्...; कोण आहेत हे पुजारी, जे जगन्नाथ पुरी येथे उभारतायत आलिशान रिसॉर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 10:26 IST

२०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट २०२६ च्या रथयात्रेपूर्वी अर्थात १४ ते १६ महिन्यांत सर्वांसाठी खुला होण्याचा अंदाज आहे. महत्वाचे म्हणजे, भाविकांना आणि यात्रेकरूंना एका आध्यात्मिक शांततेची अनुभूती देणे, हा या रिसॉर्टचा उद्देश आहे.

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे पुजारी दैतापती भवानी दास हे एक आलिशान आणि भव्य दिव्य रिसॉर्ट उभारत आहेत. पुरीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या या रिसॉर्टमध्ये एकूण ३०० रूम असतील. हे रिसॉर्ट पूर्णपणे शाकाहारी असेल. २०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट २०२६ च्या रथयात्रेपूर्वी अर्थात १४ ते १६ महिन्यांत सर्वांसाठी खुला होण्याचा अंदाज आहे. महत्वाचे म्हणजे, भाविकांना आणि यात्रेकरूंना एका आध्यात्मिक शांततेची अनुभूती देणे, हा या रिसॉर्टचा उद्देश आहे. यासंदर्भात बोलताना दैतापती भवानी म्हणाले, पुरी केवळ एक जागा नाही, तर एक पवित्र ठिकाण आहे. येथे समुद्रापासून दिव्यत्वाची अनुभूती होते. हे रिसॉर्ट आध्यात्मिक शांतता आणि  आलिशान आदरातिथ्याचे एक कॉम्बिनेशन असे. 'जगन्नाथम' नावाच्या या प्रोजेक्टसाठी जवळपास 110 कोटी रुपयांचा खर्च लागण्याचा अंदाज आहे. या खर्चात जमिनीच्या किंमतीचा समावेश नाही. 

आपण स्वतःच जमिनीचे मालक, जगन्नाथ मंदिराशी कुठलेही हितसंबंध नाहीत -हे रिसॉर्ट पुरी-कोणार्क मरीन ड्राइव्हवर एकूण सात एकर एवढ्या समुद्र किनाऱ्यावर उभारले जात आहे. जे जगन्नाथ मंदिरापासून साधारणपणे 8 किमी अंतरावर असेल. महत्वाचे म्हणजे, आपणच जमिनीचे मालक आहोत. जगन्नाथ मंदिराशी कुठलेही हितसंबंध नाहीत, असेही दैतापती यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात, दास आणि त्यांचे कुटुंब या रिसॉर्टचे 100 टक्के मालक असेल. मात्र, प्रोजेक्टच्या मेंबरशिप प्रोग्रॅमला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार, इक्विटी कमी करण्यास तयार आहेत. 

किती असेल सदस्यता शुल्क?... -या प्रोजेक्टसाठी, सदस्यत्व शुल्क ३.५ लाख, ५ लाख आणि ७ लाख रुपये, असे असेल. संबंधित सदस्यांना पाच वर्षांसाठी दरमहा तीन रात्री राहण्याची संधी मिळेल. पुरीमधील इतर आलिशान रिसॉर्ट्सच्या तुलनेत हा एक परवडणारा पर्याय आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ५,००० सदस्य बनवणे, हे रिसॉर्टचे उद्दिष्ट आहे.

रिसॉर्टमध्ये असती या खास सुविधा -या रिसॉर्टमध्ये स्टुडिओ आणि डिलक्स कॉटेज, एक स्पा, एक अँफीथिएटर, एक जॉगिंग ट्रॅक, एक टेनिस कोर्ट आणि खास वेलनेस स्पेस असतील. 

टॅग्स :OdishaओदिशाJagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राhotelहॉटेल