जिल्हा उपनिबंधकपदी हिंगोलीचे विशाल जाधव ३३ जणांची बदली : संजय राऊत पुण्याला तर एन.डी.करे यांची नाशिकला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 20:40 IST
जळगाव : जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांची पुणे येथील मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी हिंगोली येथील विशाल जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाणा येथील एन.डी.करे यांची नाशिक जिल्हा उपनिबंधकपदी नियुक्ती झाली आहे.
जिल्हा उपनिबंधकपदी हिंगोलीचे विशाल जाधव ३३ जणांची बदली : संजय राऊत पुण्याला तर एन.डी.करे यांची नाशिकला बदली
जळगाव : जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांची पुणे येथील मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी हिंगोली येथील विशाल जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाणा येथील एन.डी.करे यांची नाशिक जिल्हा उपनिबंधकपदी नियुक्ती झाली आहे.सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे सहकार खात्यातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गट अ या संवर्गातील अधिकार्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश नुकतेच काढण्यात आले. यात राज्यभरातील ३३ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगावचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांची उपनिबंधक, सहकारी संस्था, मुख्यालय पुणे या ठिकाणी बदली झाली आहे. त्यांच्या जागी हिंगोली जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांची नियुक्ती झाली आहे. बुलढाणा जिल्हा उपनिबंधक एन.डी.करे यांची नाशिक जिल्हा उपनिबंधकपदी नियुक्ती झाली आहे.