नवी दिल्ली : दोन भारतीय मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या दोन इटालियन नाविकांपैकी एकाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. १२ सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाने बजावले आहे. हा नाविक उपचारासाठी दोन महिन्यांसाठी मायदेशी जाऊ इच्छितो. यावर काही आक्षेप आहे का? अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी मैसीमिलियाना लतोरे या नाविकाच्या याचिकेवर सुनावणी केली. लतोरे यास आठवड्यातून एकदा चाणक्यपुरी ठाण्यात हजेरी लावण्यातूनही सवलत देण्यात आली आहे. ३१ ऑगस्टला त्याला 'ब्रेन स्ट्रोक' झाला होता.
इटालियन नाविक प्रकरण : कोर्टाने मागितले स्पष्टीकरण
By admin | Updated: September 9, 2014 04:22 IST