शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

IT रिटर्न दाखल करण्यास उद्या शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 21:25 IST

आर्थिक वर्ष 2016-17चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न-आयटीआर) भरण्याचा शेवटचा दिवस 31 जुलै असून, ही मुदत वाढवून दिली जाणार नाही, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी स्पष्ट केलं

नवी दिल्ली, दि. 30 - आर्थिक वर्ष 2016-17चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न-आयटीआर) भरण्याचा शेवटचा दिवस 31 जुलै असून, ही मुदत वाढवून दिली जाणार नाही, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी स्पष्ट केलं आहे. आयटी रिटर्न दाखल करण्याचा शेवटचा दिवस 31 जुलै आहे. ही मुदत वाढवण्याचा कोणताही विचार नाही. प्राप्तिकर विभागाकडे इलेक्ट्रॉनिकली फाईल झालेले सध्याच दोन कोटी रिटर्न आले आहेत.करदात्यांनी रिटर्न वेळेतच दाखल करावे, असे प्राप्तिकर अधिकारी म्हणाला. करदात्याला त्याच्या आधारकार्डला पॅन जोडणे एक जुलैपासून बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या वित्त वर्षाच्या अखेरीस प्राप्तिकर दात्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढून 6.26 कोटींवर गेली आहे. आधी ती 4 कोटी होती. केंद्रीय थेट कर बोर्डाचे (सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांनी ही माहिती दिली होती. अनिवासी भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यांचा तपशील उघड करण्याच्या मुद्द्यावरील अनिश्चितताही चंद्रा यांनी दूर केली. रिफंड देय असेल, तरच खात्यांचा तपशील उघड करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.प्राप्तिकर दिन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना चंद्रा म्हणाले होते की, नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून कर आधार वाढल्याचे बँकांनी सादर केलेल्या वित्तीय व्यवहार स्टेटमेंटवरून दिसून येत आहे. आजच्या घडीला आम्हाला 6.26 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरणारे (असेसीज) मिळाले आहेत. आमच्याकडे प्राप्तिकर विवरणपत्रे भरणारे 3 ते 4 कोटीच लोक आहेत, ही आता केवळ दंतकथा राहिली आहे. आता खूप बदल झाला आहे. प्राप्तिकराची विवरणपत्रे भरणा-यांच्या संख्येने आता खूप मोठी झेप घेतली. या वर्षाच्या सुरुवातीला प्राप्तिकर विवरणपत्रे भरणा-यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.चंद्रा यांनी म्हटले की, कर जाळे व्यापक कसे करावे, हाच आता कर अधिका-यांपुढील प्रश्न आहे. अधिकारी त्या दिशेने काम करीत आहेत. बेनामी मालमत्ता कायद्यात सुधारणा झाल्यामुळे कर अधिका-यांना असे आढळून आले आहे की, कर विवरणपत्र न भरताच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे मोठे जाळे कार्यरत आहे. त्यात असंख्य लोक अडकलेले आहेत. त्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने कार्यवाही केली आहे.