शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेतू अ‍ॅप कुणी तयार केले याची माहितीच नाही ! केंद्रीय माहिती आयोगाने दिली केंद्र सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 07:42 IST

Arogya Setu app News : माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर हे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याने केंद्रीय माहिती आयोगाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे.

नवी दिल्ली  - कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाचे मानले गेलेले आरोग्य सेतू ॲप लाखो भारतीयांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले आहे. हे ॲप केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी विकसित केल्याची माहिती आरोग्य सेतूच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी हे ॲप कुणी तयार केले याविषयी काहीही माहिती नसल्याचे उत्तर दिले आहे. माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर हे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याने केंद्रीय माहिती आयोगाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. संबंधित विभागांच्या मुख्य माहिती अधिकाऱ्यांसह नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना तंत्रज्ञान मंत्रालय, तसेच एनआयसीला ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या प्रकरणात आरटीआयअंतर्गत गुन्हा का दाखल केला जाऊ नये, असा सवालही आयोगाने केला आहे. आरोग्य सेतूच्या संकेतस्थळावर हे अ‍ॅप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन,  डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, खुद्द  एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही, अशी विचारणा केंद्रीय माहिती आयोगाने केली आहे. कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने हे अ‍ॅप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत, याबद्दल माहिती दिलेली नाही. या प्रकरणाशी संबंधित विभागांना २४ नोव्हेंबर रोजी माहिती आयोगासमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  सौरव दास यांनी यासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगाकडे तक्रार केली होती. या अ‍ॅपच्या प्रस्तावाचे मूळ, त्याच्या मंजुरीच्या प्रक्रियेचे तपशील, या अ‍ॅपच्या निर्मितीत सहभागी असलेल्या कंपन्या, व्यक्ती, सरकारी विभाग आदींचे तपशील दास यांनी माहिती अधिकारात मागितले होते. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी त्यांना विविध विभागांकडून उत्तर मिळाले नाही.  

 ‘’आरोग्य सेतू’’ची निर्मिती पारदर्शीआरोग्य सेतू ॲॅप हे अतिशय पारदर्शक पद्धतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून अवघ्या २१ दिवसांच्या विक्रमी वेळात विकसित केले असल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाने नोटीस बजावल्यानंतर केंद्राने यासंदर्भात सविस्तर खुलासा केला आहे. या ॲॅपच्या निर्मितीशी संबंधित सर्वांची नावे आधीच सार्वजनिक केलेली आहेत, याचा पुनरुच्चारही केंद्राने केला आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या