शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देशात परतताना जुन्या नोटा दाखविणे बंधनकारक

By admin | Updated: January 3, 2017 03:06 IST

अनिवासी भारतीय आणि विदेशात गेलेल्या भारतीयांना आपल्याकडील हजार-पाचशेच्या बंद नोटा बँकांत भरण्यासाठी आणखी तीन महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली असली

नवी दिल्ली : अनिवासी भारतीय आणि विदेशात गेलेल्या भारतीयांना आपल्याकडील हजार-पाचशेच्या बंद नोटा बँकांत भरण्यासाठी आणखी तीन महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली असली, तरी भारतात परतताच विमानतळावर बंद नोटा त्यांना दाखवून त्यासंबंधीच्या शपथपत्रावर कस्टम अधिकाऱ्यांचा शिक्का घ्यावा लागेल, तरच त्यांना या नोटा बँकांत भरता येतील.नोटाबंदीच्या ५0 दिवसांच्या काळात देशाबाहेर असलेल्या भारतीयांना आपल्याकडील नोटा बँकांत भरता याव्यात यासाठी ३ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. ३0 जूनपर्यंत ते आपल्याकडील नोटा बँकांत भरू शकतील. रिझर्व्ह बँकेच्या मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि नागपूर येथील शाखांत या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. भारतात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील नोटा कस्टम अधिकारी काटेकोरपणे मोजून घेतील. त्यासंबंधीच्या शपथपत्रावर शिक्का देतील. शपथपत्रावर नोटांची संख्या आणि एकूण रक्कम यांचा स्पष्ट उल्लेख असेल. शपथपत्रात नमूद रक्कमच त्यांना बँकेत जमा करता येईल. नोटाबंदीच्या काळात विदेशात असलेल्या भारतीयांना कितीही नोटा बँकेत जमा करता येतील. तथापि, अनिवासी भारतीय फक्त २५ हजार रुपयेच जमा करू शकतील. नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि बांगलादेशात राहणाऱ्या भारतीयांना ही सवलत मिळणार नाही. विदेशात राहणाऱ्या भारतीयांना इमिग्रेशन शिक्का असलेला पासपोर्ट सादर करावा लागेल. याशिवाय आधार कार्ड अथवा अन्य केवायसी दस्तावेजही सादर करावे लागतील. ५0 दिवसांच्या काळात ते खरोखर विदेशात होते हे सिद्ध करण्यासाठी हे दस्तावेज बंधनकारक करण्यात आले आहेत. बँकेत जमा करण्यात येणाऱ्या नोटा खरोखरच त्यांच्यासोबत विदेशात होत्या, याची खातरजमा करण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत.