शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:35 IST

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस देशाचा विरोध करत पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचेही म्हटलं.

Shivraj Singh Chauhan on Rahul Gandhi: जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक असल्याची जाहीर कबुली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. ओबीसींच्या संरक्षणासाठी निर्णय घेण्यात मी कमी पडलो आणि आता ती चूक सुधारायची असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागितल्यानंतर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या नशिबात माफी मागणेच असल्याचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस देशाचा विरोध करत पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचेही म्हटलं.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करताना त्यांनी देशालाच विरोध करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस कारगिल विजय दिनावरही प्रश्न उपस्थित करते. ऑपरेशन सिंदूरवरही प्रश्न उपस्थित करून पाप करत असल्याचे शिवराज सिंह चौहान म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्र्‍यांनी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेबाबत केलेल्या विधानवरही भाष्य केलं.

"काँग्रेस कारगिल विजयावर प्रश्न उपस्थित करते. २००४ ते २००९ पर्यंत यूपीए सत्तेत असताना कारगिल विजय दिन साजरा केला गेला नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने तर असेही म्हटलं की, हे युद्ध एनडीए सरकारच्या काळात लढले गेले होते, त्यामुळे आपण तो का साजरा करावा. त्यामुळे मला प्रश्न  पडतो की जेव्हा एखादा देश युद्ध लढतो तेव्हा तो कोणत्याही सरकारसाठी लढतो का? असे प्रश्न उपस्थित करणे देशभक्ती आहे का?" असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी केला.

"काँग्रेसने केवळ कारगिल युद्धावरच नव्हे तर ऑपरेशन सिंदूरवरही प्रश्न उपस्थित केले, जे चुकीचे आहे. काँग्रेस देशाचे नुकसान करण्यात गुंतलेली आहे आणि त्यांची विचारसरणी देशविरोधी बनली आहे. पंतप्रधान मोदींना विरोध करताना काँग्रेसने देशाचा विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यांचे नेते पाकिस्तानसारखे बोलतात. पण आम्ही आमच्या सैन्याच्या शौर्याचे नेहमीच कौतुक करतो," असेही शिवराज सिंह चौहान म्हणाले.

"राहुल गांधींना गोष्टी उशिराने समजतात. आधी त्यांनी आणीबाणीसाठी माफी मागितली, नंतर शीख दंगलींसाठी माफी मागितली आणि आता त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली आहे. काँग्रेसने ओबीसींसाठी काय केले आहे ते सांगावे. मंडल आयोगाचा अहवाल कोणी फेटाळला हे काँग्रेसने सांगावे. एवढेच नाही तर काँग्रेसने ओबीसींच्या कल्याणासाठी प्रत्येक पाऊल चिरडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यासाठी माफी मागितली. याआधी राहुल गांधींनी राफेल प्रकरणात माफी मागितली होती आणि आता ते १० वर्षांनी जे करत आहेत त्यासाठी माफी मागतील. माफी मागणे त्यांच्या नशिबात लिहिलेले आहे," असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानOBC Reservationओबीसी आरक्षण