नवी दिल्ली : कच्च्या तेलासह जीवाश्म इंधनाच्या सर्वाधिक मागणीची स्थिती येऊन त्यानंतर ती मागणी कधी कमी होत जाईल, हे सांगता येत नाही. ही स्थिती २०३५ दरम्यान येऊ शकते, असे काही तज्ज्ञ सांगतात. मात्र त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता, जैव व हरित इंधनाचा वापर करण्याची गरज असल्याचे मत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्यक्त केले.
येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन केंद्रात मंगळवारपासून सुरू झालेल्या चार दिवसीय ‘इंडिया एनर्जी वीक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत मांडले. पुरी म्हणाले की, २०१४ मध्ये इथेनॉलमिश्रित इंधनाची टक्केवारी १.४ होती. आता पंतप्रधानांनी यावर्षी ही टक्केवारी २० वर नेण्याची घोषणा केली. याप्रमाणेच पर्यायी इंधन स्रोतांकडे वाटचाल सुरू राहील व त्यासाठीच ही परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. पुरी म्हणाले की, २०१४ मध्ये इथेनॉलमिश्रित इंधनाची टक्केवारी १.४ होती. आता पंतप्रधानांनी यावर्षी ही टक्केवारी २० वर नेण्याची घोषणा केली. याप्रमाणेच पर्यायी इंधन स्रोतांकडे वाटचाल सुरू राहील व त्यासाठीच ही परिषद असल्याचे त्यांनी सांगितले.
विहिरीतून अधिक क्षमतेचे उत्खनन‘मुंबई हाय’जवळील सध्याची खनिज तेल उत्खनन क्षमता १.४२ लाख बॅरल प्रतिदिन आहे. ही क्षमता वाढवणे शक्य नाही. विस्तारासाठी नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आहे त्याच तेलविहिरीतून अधिक क्षमतेचे उत्खनन कसे होऊ शकेल, याबाबत तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) ब्रिटिश तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यासंबंधी ओएनजीसीने ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीशी करार केला आहे. त्यानुसार ‘मुंबई हाय’ या खनिज तेल उत्खनन क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उपाय केले जाणार आहेत.
बीपीसीएल पेट्रोब्रास यांच्यात करारभारताच्या ऊर्जा सुरक्षा प्रणालीनंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) ब्राझीलची राष्ट्रीय तेल कंपनी पेट्रोलियो ब्राझिलेरो एस. ए. (पेट्रोब्रास) सोबत ब्राझिलियन कच्चा तेलाच्या प्रकारांसाठी एक धोरणात्मक कालावधी करार केला आहे.