शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अजब योगायोगच म्हणायचा, किडनी स्वॅपिंगमुळे वाचले दोन जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:29 IST

दोन्ही रुग्णांच्या पत्नीचा रक्तगट आपल्या पतीच्या रक्तगटाशी जुळत नव्हता

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गंभीर स्वरूपाच्या आजारांशी झुंजत असलेल्या दोन रुग्णांनी आपापल्या पत्नीच्या किडन्यांची अदलाबदल केली. त्या किडन्यांचे प्रत्यारोपण केल्यानंतर दोन्ही रुग्णांचे प्राण वाचले. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासंदर्भात या रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, या दोन्ही कुटुंबातील एक-एक पुरुष सदस्य किडनीच्या विकाराने आजारी होते. किडनीचे प्रत्यारोपण केल्यास त्यांचे प्राण वाचू शकणार होते. मात्र त्यात वैद्यकीय पेच असा होता की, दोन्ही रुग्णांच्या पत्नीचा रक्तगट आपल्या पतीच्या रक्तगटाशी जुळत नव्हता. त्यामुळे पत्नीच्या किडनीचे प्रत्यारोपण पतीच्या शरीरात करता येणार नव्हते. मात्र दुसऱ्या रुग्णाच्या पत्नीचा रक्तगट पहिल्या रुग्णाशी व पहिल्या रुग्णाचा रक्तगट दुसऱ्या रुग्णाच्या पत्नीच्या रक्तगटाशी जुळत होता.

त्यामुळे दोन्ही रुग्णांनी व त्यांच्या पत्नींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अनोखा निर्णय घेतला. या पत्नींनी एकमेकांच्या किडनीची अदलाबदल केली. या शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांचे प्राण वाचले आहेत. किडनी देणाऱ्या दोन महिला व शस्त्रक्रिया झालेले त्यांचे पती यांची प्रकृती उत्तम आहे.  

दोन वर्षांपासून रुग्ण होते डायलिसिसवर किडनीच्या विकाराने आजारी असलेले दोन्ही रुग्ण गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. त्यांना किडनी प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.  या दोन रुग्णांच्या पत्नींच्या किडनींची अदलाबदल करून प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडण्याच्या निर्णयास सरकारी समितीने संमती दिली.  या दोन्ही रुग्णांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया पूर्ण होण्यास सात तासांचा वेळ लागला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdelhiदिल्ली