शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 09:44 IST

रामनवमीला सूर्यकिरणे मूर्तीवर पडतील : नृपेंद्र मिश्रा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे; तर, २० ते २४ जानेवारीदरम्यान कोणत्याही दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या संबंधित कार्यक्रमात सहभागी होतील. 

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मिश्रा यांनी सांगितले की, दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे श्रीरामांच्या मूर्तीवर पडावीत, अशी व्यवस्था मंदिरात केली जात आहे. त्यांनी सांगितले की, गर्भगृहात दोन मूर्ती असतील. एक चल आणि एक अचल. एक श्रीरामांची बाल्यावस्थेतील आणि दुसरी रामलल्लाची. बाल्यावस्थेतील मूर्तीत भगवान श्रीराम चार अथवा पाच वर्षांचे असतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात  दहा हजार विशेष निमंत्रित असतील. ज्यात साधू-संत आणि देश-विदेशांतील प्रतिष्ठित लोकांचा समावेश असेल. 

मंदिर उभारणीवर आजवर झाला ९०० कोटींहून अधिक खर्चनृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, मंदिर उभारणीवर आतापर्यंत ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झालेला आहे व संपूर्ण मंदिर तसेच परिसरावर सुमारे १,७०० ते १,८०० कोटी रुपयांचा खर्च होईल, असा अंदाज आहे. 

सूर्यकिरणांसाठी संगणकीकृत कार्यक्रम

n राममंदिराचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले की, रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामांच्या डोक्यावर सूर्यकिरणे पडावीत, अशी योजना आहे. परंतु मूर्ती ज्या दिशेला आहे, तेथे सूर्याची किरणे थेट पडत नाहीत. यासाठी सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी व पुण्यातील एका ॲस्ट्रोनॉमिकल संस्थेने मिळून संगणकीकृत कार्यक्रम तयार केला. n यात एक छोटेसे उपकरण मंदिराच्या शिखरात लावण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून किरणे येतील व पुन्हा परावर्तित होऊन प्रभू श्रीरामांच्या ललाटावर पोहोचतील. बंगळुरूमध्ये हे उपकरण तयार होत आहे. रामनवमीच्या दिवशी काही सेकंदांसाठी हे होईल. त्यामुळे त्या दिवशी तेथे जास्त संख्येने लोक पोहोचू नयेत, असा प्रयत्न असणार आहे. n हे एक आव्हान आहे. त्यावेळी कोणत्याही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी स्क्रीनवर, दूरदर्शनवर दाखवले जावे, असाही प्रयत्न आहे. २२ जानेवारीचा कार्यक्रमही सर्व भाविकांनी आपापल्या गावी पाहावा.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर