शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या भेटीदरम्यान केजरीवाल आल्यास हरकत नाही; अमेरिकेचं अप्रत्यक्ष आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 22:50 IST

मेलानिया ट्रम्प यांच्यासह केजरीवाल आणि सिसोदिया शाळेच्या दौर्‍यावर गेल्यास काहीच हरकत नाही, त्या घटनेकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये, असंसुद्धा अमेरिकेच्या दूतावासानं सांगितलं आहे.

ठळक मुद्देमेलानिया ट्रम्प यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दिल्लीतल्या सरकारी शाळा पाहण्यासाठी गेल्यास कोणतीही हरकत नसल्याचं अमेरिकेच्या दूतावासाने स्पष्ट केलं मेलानिया ट्रम्प यांच्यासह केजरीवाल आणि सिसोदिया शाळेच्या दौर्‍यावर गेल्यास काहीच हरकत नाही, त्या घटनेकडे राजकीयदृष्ट्या पाहू नयेमंगळवारी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प दिल्लीतल्या शासकीय शाळा पाहायला जाणार आहेत.

नवी दिल्ली: अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दिल्लीतल्या सरकारी शाळा पाहण्यासाठी गेल्यास कोणतीही हरकत नसल्याचं अमेरिकेच्या दूतावासाने स्पष्ट केलं आहे. मेलानिया ट्रम्प यांच्यासह केजरीवाल आणि सिसोदिया शाळेच्या दौर्‍यावर गेल्यास काहीच हरकत नाही, त्या घटनेकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये, असंसुद्धा अमेरिकेच्या दूतावासानं सांगितलं आहे.आम आदमी पार्टीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प दिल्लीतल्या शासकीय शाळा पाहायला जाणार आहेत. त्यावेळी तिथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित नसतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया 'आनंदी अभ्यासक्रम' पाहण्यासाठी दिल्लीतल्या सरकारी शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीवर अमेरिकन दूतावासाला काहीच हरकत नव्हती, मेलानिया ट्रम्प यांचा हा राजकीय कार्यक्रम नाही. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळतंय हे पाहण्यासाठी त्या जात आहेत." परंतु केजरीवाल आणि सिसोदिया अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासह दिल्लीतल्या सरकारी शाळा पाहण्यासाठी जाणार असल्यानं भाजपाला पोटशूळ उठला आहे. त्यामुळे भाजपा आणि आपमध्ये कुरघोडी सुरू झाली आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल