शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

‘मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अवघड’; यशवंत सिन्हा यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 05:36 IST

- विकास झाडे  नवी दिल्ली : आता मोदी लाट जराही नाही. विरोधकांनी एकजुटीने मुद्दे दमदारपणे लावून धरायला पाहिजेत. दुर्दैवाने तसे ...

- विकास झाडे 

नवी दिल्ली : आता मोदी लाट जराही नाही. विरोधकांनी एकजुटीने मुद्दे दमदारपणे लावून धरायला पाहिजेत. दुर्दैवाने तसे होत नाही. विरोधकांनी महाआघाडीचे सोंग करण्यापेक्षा प्रादेशिक पक्षांनी स्वबळावर लढावे. त्यातून केवळ चार राज्यांतच भाजपच्या लोकसभेच्या १०० जागा कमी होणार आहेत, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी लोकमतकडे व्यक्त केले.

मोदी मीडियाने राहुल गांधी यांना मोदींच्या विरोधात उभे केले. ते कमकुवत असल्याची प्रतिमाही निर्माण केली. मात्र, सध्या देशात ‘मोदी’ लाट ओसरली आहे. त्यामुळे विरोधकांनी तुटून पडायला पाहिजे. सरकारला जाब विचारायला पाहिजे. २०१४ मध्ये मतदार जसे मोदींच्या आश्वासनांना भाळले होते तशी आताची स्थिती नाही. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे वाटत नाही, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.

सिन्हा म्हणाले की, उत्तर प्रदेशात (८०), बिहार (४०), झारखंड (१४) आणि महाराष्ट्रात (४८) असे एकूण १८२ लोकसभा मतदारसंघ आहेत. मी या राज्यांमध्ये फिरतो आहे. या राज्यांमध्ये भाजपच्या १०० जागा कमी होणार आहेत. बिहारमध्ये लालूजींना विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात भाजप-सेनेबाबत खूप रोष आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात महाराष्ट्रातील सरकारला अपयश आले आहे. मी स्वत: राज्यात खूप ठिकाणी सभा घेतल्या. त्यातून असे दिसते की, भाजपला चांगलाच फटका बसणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांतही भाजप मागे पडतो आहे. पं. बंगालमध्ये भाजपला प्रवेश नाही. कर्नाटकात भाजप मागे आहे.सत्तेत नसतील तर त्यांचा काळ अवघडमोदी-शहा या दोघांसाठीही नंतरचा काळ फार अवघड ठरणार आहे. पुढचे भाकीत मी करण्यापेक्षा काय होते, ते देशातील जनता प्रत्यक्षात पाहीलच, असा टोलाही सिन्हा यांनी लगावला.

एम.जे. अकबर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा‘मी टू’मागे राजकारण असल्याचे नाकारता येत नाही. हा विषय महिलांशी संबंधित आहे. त्यामुळे सरकारला दखल घ्यावी लागणार आहे. एम.जे. अकबर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीस सामोरे जावे, असेही सिन्हा म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी