शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

धाडी गुप्त ठेवण्यासाठी आयटीने काढली ‘वरात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 05:13 IST

तामिळनाडूतील अद्रमुकच्या पदच्युत नेत्या व्ही. के. शशिकला आणि त्यांचे नातेवाईक तथा मित्र यांची निवासस्थाने आणि प्रतिष्ठानांवर गुरुवारी धाडी टाकण्यासाठी प्राप्तिकर विभागाने चक्क

चेन्नई : तामिळनाडूतील अद्रमुकच्या पदच्युत नेत्या व्ही. के. शशिकला आणि त्यांचे नातेवाईक तथा मित्र यांची निवासस्थाने आणि प्रतिष्ठानांवर गुरुवारी धाडी टाकण्यासाठी प्राप्तिकर विभागाने चक्क लग्नाच्या वरातीचे सोंग वठविले. ही कारवाई गोपनीय ठेवण्यासाठी हे सोंग वठविण्यात आले.धाडीत सहभागी झालेल्या ३०० पेक्षा जास्त वाहनांच्या समोरच्या, तसेच पाठीमागच्या काचांवर ‘श्रीनी वेड्स माही’ अशी स्टीकर्स चिकटविण्यात आली होती. या वाहनांत प्रत्यक्षात मात्र प्राप्तिकर अधिकारी बसले होते. या गाड्यांमधून त्यांना नेमणूक दिलेल्या ठिकाणी सोडण्यात आले. नोटाबंदीनंतर टाकण्यात आलेल्या सर्व धाडींत आतापर्यंत प्राप्तिकर विभागाचीच वाहने वापरण्यात आली होती. तथापि, गुरुवारची मोहीम फारच मोठी होती. त्यामुळे विभागास वाहने भाड्याने घ्यावी लागली.गुरुवारी नेमकी लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे विभागाने तो बहाणा करून वाहने भाड्याने घेतली आणि शेवटपर्यंत हे नाटक वठविले. अधिकाºयांना नियोजित स्थळी सोडेपर्यंत वाहनचालकांना त्यांचे मोबाइल वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. वाहन बुक करतानाच ही अट टाकण्यात आली होती.या मोहिमेस सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी तामिळनाडू पोलिसांवरच सोपविण्यात आली होती. जया टीव्हीच्या कार्यालयात अधिकारी आले, तेव्हा-तेव्हा तेथे मोठा जमाव जमला. त्याला नियंत्रणात ठेवण्याचे काम पोलिसांनीच केले. यापूर्वी तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर आणि माजी मुख्य सचिव रामा मोहन राव यांच्याविरोधात धाडी टाकण्यात आल्या होत्या, तेव्हा प्राप्तिकर विभागाने केंद्रीय राखीव पोलीस दलाची मदत घेतली होती. कारण तेव्हा तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात बेबनाव होता. या वेळी दोन्ही सरकारे एकमेकांच्या सोबत होती. त्यामुळे राज्य पोलिसांची सुरक्षा पुरेशी होती. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू