शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

असहिष्णूतेच्या मुद्यावर ओरडणा-यांना आणीबाणीचा विसर का पडला? जेटलींचा काँग्रेसवर हल्ला

By admin | Updated: November 27, 2015 13:54 IST

आणीबाणीच्या काळात देशातील नागरिकांचा जगण्याचा सर्वोच्च अधिकार हिसकावला गेल्याचा आरोप करत असहिष्णूतेच्या मुद्यावरून ओरडणा-या काँग्रेसला त्याचा विसर का पडला असा सवाल अरूण जेटलींनी केला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - असहिष्णूतेच्या मुद्यावरून गोंधळ माजवणा-यांना आणीबाणीचे विसर का पडला असा सवाल विचारत अर्थमंत्री अरूण जेटलींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. देशात आणीबाणी लादणारे, त्याला पाठिंबा देणारे व लोकांच्या जगण्याचा अधिकार हिसकावणारे आज राज्यघटनेवर बोलत, देशात असहिष्णूता वाढल्याचा कांगावा करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला हाणला. संविधान दिनानिमित्त संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. 
राज्यघटनेच्या निर्मितीत ज्यांचे योगदान नाही, घटनेविषयी ज्यांना आस्था नाही तेच लोक त्याच्या वचनबद्धतेची चर्चा करीत त्याचे अग्रणीही बनू पाहत आहेत, असा आरोप काल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला होता. जेटली यांनी चर्चेच्या सुरूवातीलाच त्यांना उत्तर दिले. घटना समितीच्या स्थापनेनंतर चार-पाच वर्षांनी माझा जन्म झाल्याने आम्ही घटना स्थापन समितीत असणं शक्य नाही. पण जनसंघाचे संस्थाप ( आता भाजपा) श्यामाप्रसाद मुखर्जी हे घटना समितीचे सदस्य होते, त्यांचेही देशाच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते, असे जेटली म्हणाले.
असहिष्णूतेच्या मुद्यावरून ओरडणा-या काँग्रेसला जेटलींनी आणीबाणीच्या काळाची आठवण करून दिली. काँग्रेस आज असहिष्णूतेच्या मुद्यावर आवाज उठवत आहे, मात्र ते इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीबद्दल विसरले का? असा सवाल जेटली यांनी केला. त्याकाळात घटनेतील  २१व्या कलमाची पायमल्ली करण्यात आली. तुम्ही आणीबाणी लागू करून विरोधकांना तुरूंगात डांबलं होतं, ते संपूर्ण दशकच हुकुमशाहीचं होतं असा आरोपही जेटली यांनी केला. मात्र सध्या देशात अशी (आणीबाणीसारखी) कोणतीही परिस्थिती नाहीये. आज एखादी व्यक्ती टीव्हीच्या कॅमे-यासमोर येऊन काही बोलली तरी देशातील वातावरण बिघडल्याची, असहिष्णूता वाढल्याची ओरड सुरू होते, असे जेटली म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवर आपले मत मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना कोणत्याही धर्माच्या बाजूने अथवा विरोधात नाही. घटनेतील कलम २५ नुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे आचरण करण्याचा तसेच त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. यातूनच धर्माच्या आधारे सरकारकडून कोणत्याही व्यक्तीत दुजाभाव केला जाऊ असेच डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते, असे जेटली म्हणाले. कोणतीही सरकारी संस्था लोकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांत हस्तक्षेप करू शकत नाही. स्वतंत्र न्यायव्यवस्था हे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचाच भाग असल्याचे त्यांनी म्हचल