शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:12 IST

भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी 2026 ची सुरुवात निराशाजनक ठरली आहे.

श्रीहरिकोटा: भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी 2026 ची सुरुवात निराशाजनक ठरली आहे. आज (12 जानेवारी 2026) रोजी ISROकडून प्रक्षेपित करण्यात आलेले या वर्षातील पहिले PSLV-C62 मिशन तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरले. श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपणानंतर रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात (PS3) चेंबर प्रेशर अचानक कमी झाल्याने, रॉकेट आपल्या ठरलेल्या कक्षेपथापासून भरकटले.

या अपयशात DRDO चा महत्त्वाचा रणनीतिक सर्व्हिलन्स उपग्रह ‘अन्वेषा’, तसेच अन्य 15 लघुउपग्रह अंतराळात हरपल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मे 2025 मधील PSLV-C61 नंतरचे हे ISRO चे सलग दुसरे अपयशी PSLV मिशन ठरले आहे.

स्मूथ लॉन्चनंतर अचानक बिघाड

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 10:18 वाजता PSLV-C62 चे प्रक्षेपण सुरळीत आणि यशस्वी झाले होते. मात्र त्यानंतर पुढील काही मिनिटांत परिस्थिती बदलली. प्रक्षेपणानंतर सुमारे 8 मिनिटांनी तिसऱ्या टप्प्यात कार्यक्षमतेत बिघाड, चेंबर प्रेशरमध्ये अचानक घट आणि आवश्यक थ्रस्ट न मिळाल्याने रॉकेट कक्षेपथापासून भरकटले. यामुळे उपग्रहांना अपेक्षित कक्षेत पोहोचवणे शक्य झाले नाही.

ISRO चेअरमन वी. नारायणन यांचे स्पष्टीकरण

ISRO चे अध्यक्ष व्ही नारायण यांनी मिशननंतर दिलेल्या निवेदनात सांगितले की, “मिशनदरम्यान एक तांत्रिक अडचण निर्माण झाली. सुरुवातीचे फ्लाइट स्टेज पूर्णपणे सामान्य होते. मात्र तिसऱ्या टप्प्यात (PS3) चेंबर प्रेशरमध्ये अचानक घट झाली. त्यामुळे अपेक्षित थ्रस्ट मिळू शकला नाही आणि रॉकेट निर्धारित कक्षेपासून इतरत्र गेले. फेलियर अ‍ॅनालिसिस कमिटी सर्व डेटाचा सखोल अभ्यास करणार असून, समान लोड परिस्थितीत फ्लेक्स नोजलची तपासणी करून अपयशाचे मूळ कारण शोधले जाईल."

‘अन्वेषा’सह 16 उपग्रह हरपले

ISRO च्या माहितीनुसार, PSLV-C62 चा मुख्य पेलोड असलेला DRDO चा रणनीतिक सर्व्हिलन्स उपग्रह ‘अन्वेषा’ आणि इतर 15 उपग्रह आता अंतराळात हरपल्याची शक्यता आहे. ISRO अधिकाऱ्यांच्या मते, अंतराळातील प्रचंड व्हॅक्यूममध्ये आणि सुमारे 8,000 किमी प्रतितास वेगाने प्रवास करताना अगदी लहानसा तांत्रिक दोषही मिशन पूर्णपणे नियंत्रणाबाहेर नेऊ शकतो.

यापूर्वीही झालेला बिघाड 

PSLV-C62 पूर्वी मे 2025 मध्ये PSLV-C61 मिशनमध्येही असाच बिघाड झाला होता. त्या वेळीही लॉन्च यशस्वी झाला होता, मात्र तिसऱ्या टप्प्यात चेंबर प्रेशर घटले आणि  थ्रस्ट कमी झाल्याने उपग्रह कक्षेत पोहोचू शकले नव्हते. सलग दोन वेळा PSLV च्या तिसऱ्या स्टेजमध्येच बिघाड झाल्याने ISRO समोर तांत्रिक पुनरावलोकनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ISRO's PSLV-C62 Mission Fails Again: Technical Glitch Explained

Web Summary : ISRO's PSLV-C62 mission failed due to a third-stage technical issue, losing the DRDO's 'Anvesha' satellite and 15 others. Chamber pressure dropped post-launch, deviating from the orbit. This marks ISRO's second consecutive PSLV failure, prompting a thorough review.
टॅग्स :isroइस्रो