शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आता 'शुक्र'ही इस्रोच्या कक्षेत येणार; लवकरच यान पाठवण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 10:27 IST

सूर्यमालेतील सर्वात उष्ण असलेल्या शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचं इस्रोचं लक्ष्य.

नवी दिल्ली : चंद्र व मंगळावरील मोहिमेनंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) आता सूर्यमालेतील सर्वात उष्ण असलेल्या शुक्र ग्रहावर डिसेंबर २०२४ मध्ये अवकाश यान पाठविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 

यासंदर्भात इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. शुक्रावर आखावयाच्या अंतराळ मोहिमेला नेमका किती खर्च येईल, तसेच त्यामध्ये तंत्रज्ञानविषयक कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करावा लागेल, याचा प्रकल्प अहवाल तयार केल्याचे एस. सोमनाथ यांनी या बैठकीत सांगितले. या मोहिमेचे भारताला उत्तम फलित मिळणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

या मोहिमेचा फायदा काय?

  • शुक्राच्या पृष्ठभागाखाली तसेच तेथील वातावरणात सल्फ्युरिक ढगांच्या आच्छादनाखाली कोणते घटक आहेत, याचा शोध इस्रो घेणार आहे. 
  • त्याकरिता शुक्र ग्रहाची परिक्रमा करण्याकरिता इस्रो एक यानही तयार करीत आहे. हे यान शुक्राभोवती १०० ते १५० वेळा घिरट्या घालणार आहे. 
  • शुक्र ग्रहावर असलेले जिवंत ज्वालामुखीचे प्रदेश व लाव्हारसाचे प्रवाह, तेथील पृष्ठभागाची रचना, वातावरणाचा अभ्यास भारत या मोहिमेत करणार आहे. सौरवाऱ्यांचा या ग्रहावर होत असलेला परिणामही अभ्यासण्यात येईल. 

२०२४ कशामुळे?या कालावधीत पृथ्वी व शुक्र ग्रहाची भ्रमणस्थिती अशी असेल की, शुक्राचे अवकाश यानाद्वारे अधिक चांगले निरीक्षण करता येईल. त्यासाठी अवकाश यानाला किमान प्रमाणात इंधन लागणार आहे. या दोन ग्रहांबाबत अशी भ्रमणस्थिती २०३१ मध्ये पुन्हा येण्याची शक्यता आहे. 

भारताकडे अंतराळ संशोधनासाठी असलेली क्षमता लक्षात घेता, शुक्र ग्रहावरील मोहिमेची तयारी दोन वर्षांच्या काळात करता येईल. या ग्रहावर डिसेंबर २०२४ मध्ये अंतराळ यान पाठविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. - एस. सोमनाथ 

टॅग्स :isroइस्रो